पवारांच्या नेतृत्वाला महाविकास आघाडीतूनच सुरुंग; काँग्रेस आणि ठाकरे यांनी रोखली पवारांची double game!!

नाशिक : राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीवर महाविकास आघाडीतून शिक्कामोर्तब होणार नाही, हे लक्षात येताच शरद पवारांनी भाजपला डोळा मारला आणि त्यांनी भाजपला सातवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायला लावला, अशा आशयाच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या यातून पवारच कसे “चाणक्य” आहेत, असे दाखवायचा *डाव” पवार बुद्धीच्या मराठी माध्यमांनी खेळला. पण प्रत्यक्षात शरद पवारांच्या नेतृत्वाला महाविकास आघाडीतूनच सुरुंग लागला. काँग्रेस आणि ठाकरे यांनी पवारांची double game रोखली, ही राजकीय वस्तुस्थिती लपून राहात नाही.

कारण शरद पवार महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार म्हणून निवडून येणार आणि नंतर भाजपला डोळा मारणार हे सांगायला फार कुठल्या मोठ्या ज्योतिषाची गरज नव्हती. पवारांनी भाजपला डोळा मारणे ही घटना देखील नवीन नव्हती. वास्तविक पवार महाविकास आघाडीत राहून काँग्रेस आणि शिवसेनेला पोखरत भाजपला कायमच डोळा मारत राहिले. होते. काँग्रेसचे नेते अदानी आणि अंबानी यांच्या विरोधात जोर जोरात बोंबा ठोकत असताना शरद पवार मुद्दामून अदानींना बारामतीत बोलवून काँग्रेसला खिजवत होतेच.

– पवारांचा इतिहास पराभवाचा

पण पवारांच्या खरा राजकीय इतिहासाचा आहे की ते कधीच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या समोर लढताना जिंकले नाहीत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने पवारांना कायम बॅकफूटवर ढकलले पवारांचे मनसूबे उधळले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांना कितीही मानमरातब देऊन काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला खिजवले, तरी काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व पवारांच्या सारख्या प्रादेशिक नेत्यांपुढे दबले किंवा झुकले नाही. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने कायमच पवारांना त्यांचे मूळ राजकीय स्थान किंवा मूळ राजकीय किंमत ही एका प्रादेशिक नेत्याची आहे हेच दाखवून दिले.

– पवारांच्या इच्छेची दखल नाही

म्हणून तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नईला यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करून काँग्रेससाठी राज्यसभेची जागा सोडा आणि तुम्ही विधान परिषद घ्या, अशी ऑफर देऊन शरद पवारांचा राज्यसभेचा पत्ता परस्पर कापला. रमेश चेन्नईतला किंवा काँग्रेसचे अन्य नेत्यांनी शरद पवारांना फोन करून त्यांची इच्छा विचारण्याची साधी तसदी सुद्धा घेतली नाही.



या सगळ्या राजकारणामध्ये विद्यमान विधानसभेची आकडेवारी लक्षात घेता काँग्रेस किंवा शिवसेना यांचा खासदार निवडून येता येणार नाही हे खरे किंबहुना ते या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना माहिती आहे, हे सुद्धा खरे, पण तरीसुद्धा काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवारांच्या राज्यसभा एंट्रीला रोखून त्यांना त्यांची खरी राजकीय किंमत दाखवून दिले किंबहुना शरद पवारांची double game ठाकरे आणि काँग्रेस यांनी रोखली. कारण काँग्रेसला जरी महाराष्ट्रातून राज्यसभेवर एक खासदार निवडून आणून म्हणजेच मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडून आणून राज्यसभेतले विरोधी पक्ष नेतेपद टिकवायचे असले, तरी शिवसेनेला राज्यसभेच्या एका जागेचे तेवढे महत्त्व नाही. कारण शिवसेनेचे मूळ राजकारण हे खऱ्या अर्थाने संसदीय नाहीच.

– पवारांचा दर्प तोडला

त्या उलट शरद पवारांना संसदीय राजकारणाचे कायमच आकर्षण वाटत राहिले आपण कुठूनही निवडून येऊन नेहमीच कुठल्या ना कुठल्या सभागृहाचे सदस्य राहतो म्हणजेच लोकप्रतिनिधी राहतो, असा शरद पवारांना दर्प किंवा अहंकार आहे, म्हणून तर शरद पवारांची संसदीय कारकीर्द साठ वर्षांची असल्याची टिमकी सुप्रिया सुळे यांच्यापासून राष्ट्रवादीचे सगळेच नेते आणि कार्यकर्ते वाजवत राहिले. पवारांचा हा संसदीय राजकारणाचा अहंकार किंवा दर्प शिवसेनेच्या दोन तरुण नेत्यांनी तोडला. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी शरद पवारांविषयी आदर जरूर दाखविला, पण त्यांच्या इच्छेसाठी शिवसेनेने त्याग करण्याची भाषा नाकारली. त्यांनी शिवसेनेचा राज्यसभेच्या जागेवरचा हक्क सोडला नाही. त्यामुळेच पवारांची महाविकास आघाडीतली राज्यसभेची उमेदवारी अडकून राहिली.

– शिवसेनेच्या दोन तरुण नेत्यांची कामगिरी

आता राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून उभे राहिले तर एक तर त्यांना भाजपच्या पाठिंबावर म्हणजेच भाजपच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांनी निवडून येता येईल म्हणजेच त्यांना भाजपच्या अंकित राहावे लागेल. किंबहुना भाजपला छुप्या पद्धतीने डोळा मारतोय, असले राजकारण करता येणार नाही किंवा भाजपच्या मदतीशिवाय त्यांना निवडून यायचे असेल, तर स्वतःच्या राज्यसभा जागेसाठी त्यांना काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील. एवढे करूनही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडतील, याची शक्यताही धूसर आहे. कारण काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही कधी ना कधी शरद पवारांना धडा शिकवायचाय, म्हणून, तर आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई त्यांच्यासारख्या तरुण नेत्यांना उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे बोलायला लावले. त्यामुळे आता शरद पवार काहीही करून राज्यसभेवर निवडून आले किंवा ते पडले तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीतल्या त्यांच्या एकमेव असलेल्या नेतृत्वाला सुरुंग लागलाय आणि तो शिवसेनेच्या दोन तरुण नेत्यांनी लावलाय, हे मात्र निश्चित!!

Congress and Thackeray destroyed Sharad Pawar leadership in MVA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात