वृत्तसंस्था
अहमदाबाद : Surat Stranded इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे मध्य-पूर्वेकडील देशांमध्ये हवाई प्रवासावर गंभीर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण निर्बंध लागू केल्याने सौदीसह आंतरराष्ट्रीय विमानांची मोठ्या प्रमाणावर रद्दबातल झाली आहे. या परिस्थितीत रमजान महिन्यात मक्का-मदिना उमराहसाठी गेलेले सुरत जिल्ह्यातील 300 हून अधिक भाविक तिथे अडकले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.Surat Stranded
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत जिल्ह्यातील मोसाली, कठोर, खोलवड, कोसंबा, ओलपाड, मांगरोळ आणि तडकेश्वर यांसारख्या भागांतील यात्रेकरू रमजानपूर्वी मक्का-मदिना येथे पोहोचले होते.Surat Stranded
उमराहचे 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने विमान सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या, त्यामुळे हे भाविक मक्का येथे अडकले आहेत. इराण-इस्त्रायल संघर्षासोबतच दुबईमध्येही विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने भारतातील हाजींचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
सध्या इंडिगो, स्पाइसजेट आणि अकासा यांसारख्या एअरलाईन्सच्या विमानसेवा अनिश्चित असल्याने सरकारने मक्का-मदिना गेलेल्या हाजींना लवकरात लवकर सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App