Navnath Ban : राऊतांनी आंतरराष्ट्रीय विषयात नाक खुपसू नये! मोदींचे नेतृत्व सक्षम, संजय राऊत काँग्रेसचे दलाल, नवनाथ बन यांची टीका

Navnath Ban

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Navnath Ban  युद्धाच्या काळात भारताने काय भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर नेते आणि अधिकारी बसलेले आहेत, संजय राऊत यांनी त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. देशाची मान खाली जाईल अशी वक्तव्य तुम्ही करु नका, भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सक्षम आणि समर्थपणे पुढे जात आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.Navnath Ban

नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे 140 कोटी जनतेने पाहिले आहे. राऊतांकडून आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करण्याचे काम केले जात आहे. देशात राहून परदेशी लोकांचे गुणगान गायचे हे संजय राऊत यांचे धोरण झाले आहे. पंतप्रधान मोदींचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान करण्याचे त्यांचे धोरण झाले आहे.Navnath Ban



 

गुलामांनी इतराबद्दल आरोप करू नये

नवनाथ बन म्हणाले की, भारत अमेरिकेचा गुलाम झालेला नाही, या दोन्ही देशामध्ये झालेल्या करारामध्ये जो काही निर्णय झाला त्यामुळे आपल्यावरील टॅरिफ कमी झाला आहे. राऊत हे राहुल गांधी, सोनिया गांधीचे गुलाम झाले आहेत. ते काँग्रेसचे दलाल झाले आहेत. गुलामांनी इतराबद्दल आरोप करू नये.

राऊतांनी नाक खुपसण्याची गरज नाही

नवनाथ बन म्हणाले की, युद्धाची जी काही स्थिती आहे त्यावर आपले पराराष्ट्र मंत्री आणि देशाची व्यवस्था पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. याप्रकरणामध्ये राऊतांनी नाक खुपसण्याची गरज नाही. ते पंतप्रधान मोंदीचा अपमान होईल अशी भाषा वापरत आहे, हा पंतप्रधानांचा नाही तर 140 कोटी भारतीयांचा आहे. भारतामध्ये राहायचे आणि इतर देशातील लोकांचे गुणगान गायचे हा राऊतांचा धंदा झाला आहे.

राऊतांनी स्वत:ची चिंता करावी

नवनाथ बन म्हणाले की, आखाती देशांमध्ये जे कोणी भारतीय नागरिक आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम यंत्रणाकडून केले जाईल, राऊतांनी त्यांची चिंता करू नये. तु्ही तुमच्या पक्षात तुमची काय अवस्था आहे यांची चिंता केली पाहिजे. तुमच्या उबाठा गटात तुम्हाला कोणी विचारत नाही, त्यामुळे अधून मधून काँग्रेस, शरद पवार गटाची प्रवक्तेगिरी करणे हा तुमचा धंदा आहे. अखाती देशात काही भारतीय नागरिक अडकले आहेत त्यांना देशात सुरक्षित आणण्यासाठी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व सक्षम आहे. देशाची चिंता करण्याची जबाबदारी जनतेने मोदींना दिली आहे तुम्ही पक्षाची आणि स्वत:ची चिंता करा.

राऊतांनी फडणवीसांची माफी मागावी

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे VSR मध्ये विमान असेल आणि राजकीय नेत्यांची त्यामध्ये गुंतवणूक असेल असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांनी माफी मागावी मी असे कालच सांगितले होते पण संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही त्यामुळे मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवत आहे. संजय राऊत यांनी 7 दिवसांत फडणवीसांची माफी मागावी अन्यथा या प्रकरणामध्ये कायदेशीरबाबीला सामोरे जावे लागेल. सोमय्या, भुसे यांच्या प्रकरणी जशी कोर्टात जाऊन माफी मागितली. आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दलदेखील तुम्हाला माफी मागावी लागेल. तुम्ही बिनबुडाचे आरोप करतात. त्यांनी काल नशेमध्ये आरोप केले असतील. त्यांच्याकडे पत्राचाळ, कोविड काळात केलेल्या घोटाळ्याचे पैसे आहेत.

Sanjay Raut Should Not Meddle in International Affairs Navnath Ban VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात