इराणचे सगळे नेतृत्व संपवायचा अमेरिकेचा इरादा; पण जगभरात होणार तेलाचा भडका!!

नाशिक : इराणचे सगळे नेतृत्व संपवायचा अमेरिकेचा इरादा; पण जगभरात होणार तेलाचा भडका!!, हेच अमेरिका इजराइल विरुद्ध इराण युद्धाचे परिणाम लवकरच दिसून येण्याची शक्यता आहे. Iran leadership

इजरायलने आज अमेरिकेच्या साथीने सकाळीच इराण मधल्या तब्बल 30 ठिकाणांवर मिसाईल हल्ले आणि बॉम्ब हल्ले केले त्यामध्ये शेकडो इराणी सैनिक मारले गेले. इराणचे सर्वोच्च नेते आयातीला खामेनी यांच्या निवासस्थानाला उडवून दिले, अशा बातम्या आल्या. त्या पाठोपाठ इराणी सुद्धा अमेरिकेला युद्ध तुम्ही सुरू केलेत ते संपवू आम्ही, अशी दमबाजी केली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी इराणविरुद्धचे नेहमीचच मुद्दे मांडले. पण त्याचबरोबर अमेरिकेचा इरादा देखील जाहीर केला. इराणमध्ये सध्या दहशतवाद्यांची राजवट सुरू आहे. इरणच सगळ्यात जगभरात दहशतवाद “निर्यात” करणारा देश बनलाय. त्या देशातली दहशतवाद्यांची राजवट संपविल्याशिवाय अमेरिका स्वस्थ बसणार नाही. आज 30 ठिकाणी हल्ले केलेत. हे हल्ले आणखी वाढतील, कारण इराणची क्षेपणास्त्रे अमेरिकेपर्यंत पोहोचायच्या आतच ती नष्ट करावी लागतील. त्यांची अण्वस्त्रक्षमता उद्ध्वस्त करावी लागेल, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.



– राजवट बदलायचा इरादा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यातून अमेरिकेचा सगळा इरादाच उघड्यावर आला. अमेरिकेला इराण मधली आयतुल्लाह खामेनी यांची राजवट संपायची आहे. तिथे पूर्ण राजवट बदलून टाकून फक्त अमेरिकेला अनुकूल अशी राजवट आणायची आहे. त्यासाठीच इजराइलच्या भूमीवरून अमेरिकेने इराणवर हल्ले केले.

– जग विभागले दोन गटांमध्ये

त्यामुळे आता जग दोन गटांमध्ये विभागले असून एकीकडे इराणच्या बाजूने रशिया आणि चीन हे दोन बलाढ्य देश युद्धात उतरायच्या तयारीत असल्याच्या बातम्या आल्यात. त्यांच्याबरोबर तुर्कस्तान, सौदी अरेबिया, कतार हे देखील युद्धात उतरू शकतात, तर दुसऱ्या बाजूने अमेरिका, फ्रान्स इजरायल आणि नाटो करारातील देश उभे ठाकलेत. फ्रान्सने सुरुवातीला तटस्थ भूमिका जाहीर केली होती पण इराणनेच फ्रान्सला युद्धाची धमकी दिल्याने फ्रान्सही अलर्ट मोडवर आला. या पार्श्वभूमीवर भारताने मात्र आपली भूमिका तटस्थ असल्याचे जाहीर करून पश्चिम आशियात लवकरात लवकर शांततेसाठी पुन्हा चर्चा सुरू करायचा आग्रह धरलाय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इजराइल दौरा संपल्याबरोबर इजरायलने इराणवर हल्ला केल्याने मुस्लिम जगतात भारताच्या भूमिके विषयी दाट संशय निर्माण झालाय.

– तेलाचा होणार भडका

जोपर्यंत इराण आपला अण्वस्त्रे विकास कार्यक्रम आणि क्षेपणास्त्रे विकास कार्यक्रम स्थगित करत नाही तोपर्यंत हे युद्ध थांबण्याची शक्यता नाही. अमेरिका आणि इजरायल हे दोन्ही देश मिळून इराणची सगळी सामरिक शक्ती उद्ध्वस्त करायच्या इराद्यानेच युद्धात उतरलेत. पण या सगळ्याचा परिणाम म्हणून तेल उत्पादक देश तेलांच्या किंमती प्रचंड वाढवून जास्तीत जास्त पैसा कमवायचा उद्योगाला लागण्याची दाट शक्यता आहे. याचा परिणाम अमेरिकेसह सगळ्या जगाला भोगाव लागणार आहे. कारण तेलाचे भाव वाढले की त्याचे दुष्परिणाम जगभरातल्या वस्तूंच्या भाववाढीत होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांना सुद्धा महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

America’s intention to eliminate all of Iran’s leadership

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात