आदित्य ठाकरे बरोबर बोलताहेत, असे म्हणत संजय राऊतांनी पुन्हा रेटली शरद पवारांची उमेदवारी; पण खासदारकी अवघडच!!

Sharad Pawar

नाशिक : आदित्य ठाकरे बरोबर बोलत आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी आज पुन्हा रेटली शरद पवार यांची राज्यसभा उमेदवारी!!, असे आज संजय राऊत यांच्या नियमित पत्रकार परिषदेत घडले. पण संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यातले between the lines न वाचता साधे तपशील जरी वाचले तरी शरद पवारांची राज्यसभा खासदारकी अवघड आहे हेच राजकीय वास्तव आज समोर आले.

– आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई यांचा विरोध

शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले असताना सुरुवातीपासूनच संजय राऊत यांनी शरद पवारांचे उमेदवारी लावून धरली, पण आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई या शिवसेनेच्या दोन तरुण आमदारांनी शरद पवारांच्या उमेदवारीला छेद दिला. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे आम्ही 2020 आणि 2022 मध्ये इतर पक्षांना जागा सोडल्या आता 2026 मध्ये मात्र शिवसेनेचा खासदार राज्यसभेवर जावा, अशी आमची इच्छा आहे, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याला वरूण सरदेसाई यांनी दुजोरा दिला. शरद पवारांबद्दल आम्हाला आदर आहे पण शिवसेनेचा खासदार राज्यसभेवर गेला पाहिजे. कारण आम्हाला राज्यसभेत एक गट बनवायचा आहे आणि एका खासदाराचा गट बनू शकत नाही. रोटेशन नुसार राज्यसभेच्या खासदारकीवर शिवसेनेचाच दावा आहे. आज शरद पवारांचे नाव मोठे नेते म्हणून समोर आले. उद्या आणखी कुठले नाव मोठे नेते म्हणून समोर येईल, पुढच्या निवडणुकीत संजय राऊत यांचे जागा आम्हाला सोडावी लागेल, पण म्हणून शिवसेनेने दरवेळेस त्याग करायची गरज नाही, अशी परखड भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली.



– काँग्रेसचा आक्षेप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा शरद पवारांच्या उमेदवारीला विरोध केला. काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद टिकवायचे असेल, तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेची निवडणूक लढवावी, अशी सूचना त्यांनी केली.

– शरद पवारांची खासदारकी अवघड

पण संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांचीच उमेदवारी पुढे रेटली, पण तरीसुद्धा आदित्य ठाकरेच बरोबर बोलत आहेत, असे त्यांना सांगावे लागले. मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडे महाराष्ट्र सोडून अनेक राज्ये आहेत. प्रादेशिक पक्षांना राज्यसभेत किमान दोन खासदार लागतात. आम्हालाही दोन खासदार लागतात. त्यामुळे आदित्य ठाकरे जे बोलतात, ते बरोबर आहे. कारण शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. त्यामुळे एकट्याच्या बळावर कुणीच राज्यसभेवर खासदार निवडून आणू शकत नाही. शरद पवार आजारी आहेत. ते अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्या काही चाचण्या सुरू आहेत, पण ते लवकरच बरे होऊन सक्रिय होतील. त्यांच्यासारखा नेता राज्यसभेत हवा असे आम्हाला वाटते, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी शरद पवारांचे राज्यसभा उमेदवारी पुन्हा रेटली. पण संजय राऊत यांच्या वक्तव्यातल्या वेगवेगळ्या तपशिलांमुळेच शरद पवारांची राज्यसभा खासदारकी किती अवघड आहे आणि शिवसेनेतले तरुण नेते तसेच काँग्रेसचे नेते त्यांच्या बाजूने बिलकुलच अनुकूल नाहीत, हेच राजकीय वास्तव स्पष्ट झाले.

Sanjay Raut back Sharad Pawar’s candidature despite Aditya Thackeray’s opposition

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात