विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunil Tatkare सुनेत्रा पवार यांचा शपथविधीला इतकी का घाई का झाली त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तसेच विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वी का सुरू करण्यात आली. का सतत मुलाखतीला फेरा सुरू ठेवण्यात आला? विलीनीकरणाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कसा संबंध येतो हे जर मला सांगितले तर मी माझी भूमिका मांडेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.Sunil Tatkare
सुनील तटकरे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण असा काही मुद्दाच नव्हता. आमचा पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे, म्हणजे भाजपचा मित्रपक्ष आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारमध्ये मंत्रिपदे आम्हाला देण्यात आली आम्ही एकत्रित लोकसभेची निवडणूक लढवली, आणि आताही सत्तेत सोबत आहोत त्यामुळे आमच्या विलीनीकरणाबद्दल भाजपसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. 2019 मध्ये मविआ स्थापन करत असताना सोनिया गांधींची परवानगी मागण्यात आलीच ना? कारण तो युपीएमधील महत्त्वाचा पक्ष आहे. युती-आघाडी करत असताना महत्त्वाच्या पक्षासोबत चर्चा करावी लागत असते.Sunil Tatkare
जनता, आमदारांच्या भावनेतून सुनेत्रा पवारांची निवड
सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडतांना जनतेची आणि आमदारांची भावना लक्षात घेत आम्ही सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. त्यावर आशावेळी प्रश्न चिन्ह निर्माण करणे योग्य नाही. अजित पवार यांनी गेल्या 3 वर्षांत जो प्रचंड जनसंपर्क तयार केला त्यामुळे विधानसभेला जनतेने आम्हाला मोठी साथ दिली. आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे, कुणाला काहीही वाटो, असे तटकरे यांनी सुनेत्रा पवारांच्या निवडीबद्दल बोलताना म्हटले आहे.
कोणता पक्ष विलीन करणार?
सुनील तटकरे म्हणाले की, विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार? असा सवाल मी गेले 2 ते 3 दिवस विचारतो आहे, पण त्यावर दुर्दैवाने कोणी काहीच बोलत नाही, त्यांचे कारण मला काही कळू शकलेले नाही. ही चर्चा कोण सुरू करणार हा प्रश्न आहे. गेली 8 ते 10 महिने मी म्हणतोय की आम्ही एनडीएमध्ये आहोत जे भाजपसोबत येण्यासाठी अनुकुल आहेत तेच या चर्चा करू शकतात, नाही तर चर्चा करण्याचे काही प्रश्नच नाही. माझा विलीनीकरणाला विरोध आहे की नाही हा मुद्दा काही महत्त्वाचा नाही. अजित पवार यांचा विश्वासू सहकारी म्हणून गेली 40 वर्षे मी काम करत आलो आहे. त्यामुळे माझ्यावर अनेक वेळा आक्षेप घेतले गेले आहेत. अजित पवारांचा निर्णय असता तर माझा त्याला विरोध असण्याचा काही मुद्दाच नव्हता. मी नेहमी अजित पवारांचे निर्णय मान्य केला आहे.
योग्यवेळी राष्ट्रीय अध्यक्षांची निवड
सुनील तटकरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला ती माहिती अजित पवारांनी दिली होती. जिल्हा परिषद निवडणूक ही घड्याळीच्या चिन्हावर लढण्याचे ठरले होते त्यासंदर्भात आमचे बोलणे झाले. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विधीमंडळ पक्षनेता निवडणे गरजेचे होते. योग्यवेळी कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन आम्ही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करू. 2019 मध्ये अजित पवारांची इच्छा होती की भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार व्हावे त्यावेळी त्यांच्या इच्छेकडे कोणी लक्ष दिले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App