विशेष प्रतिनिधी
मुंबई : Laxman Hake राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन आदेशामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आले असून, ओबीसी समाजाची मसलत संपल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.Laxman Hake
लक्ष्मण हाके यांनी मराठा नेते जरांगेंच्या आडून काही क्रूर मराठा राजकीय नेते आपला हेतू साध्य करत असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी पत्रातून केला आहे. जरांगेंचा सगळा खटाटोप राजकीय आरक्षणासाठी होता, परंतु यामध्ये बळी मात्र ओबीसी आणि भटक्या जातसमूहाचा गेल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी समाजाची हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी अधिकच तीव्र झाली आहे.Laxman Hake
हाकेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचा जशास तसे…
गेल्या ७ वर्षांपासून पंचायतराज निवडणूका झाल्या नव्हत्या. २०२२ पुर्वचे आरक्षण ग्राह्य धरुन पंचायतराज निवडणूका घ्या, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ओबीसींना थोडंसं हायसं वाटलं. अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते नगरसेवक ते महापौर ओबीसी जागेवर होण्याची गुलाबी स्वप्ने पडू लागली पण जरांगें नावाच्या गोलमाल योद्धयाने मुंबई गाठली. सरकारच्या मानगुटीवर बसून हैद्राबाद गॅझेटचा जीआर मंजूर करुन घेतला.
बोगस दाखले काढून संरजामी मराठे ओबीसी आरक्षणावर अगोदरच अनधिकृत ताबे मारत होते. या बेकायदा जी आर मुळे अशा टोळीला १२ हत्तींचं बळ मिळालंय. हैद्राबाद गॅझेट मुळे कुळातील – गावातील – नातेसंबधातील लोकांना एका ऑफिडिट द्वारे कुणबीकरणाद्वारे ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे साहेब?
हा जी आर ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार हे दाव्याने सांगतो साहेब. जे नारायण राणे समितीला जमले नाही , जे गायकवाड आयोगाला जमले नाही ते तुम्ही केलंय , कोर्टात या जी आर ला किती अर्थ आहे हे आम्हाला माहिती आहे पण आज रोजी ओबीसी आरक्षण संपलंय कारण सुप्रीम कोर्टाच्या भाषेत मराठा जात शासनकरती जात आहे त्यांच्या स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल साहेब.
आणि हो साहेब आम्ही वारंवार सांगतोय जरांगे हा फक्त मुखवटा आहे. त्यांच्या आडून क्रुर मराठा राजकीय नेते आमदार – खासदार – कारखानदार त्यांचा हेतू साध्य करतायेत. प्रस्थापित मराठा समाजाला सरंपचपदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदे स्वतःकडे ठेवायची आहेत. गरजवंत मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीशी जरांगेला देणं घेणं नाही. ईब्लुएसच्या कटऑफचा फरक ओबीसींहून १५ ते २० गुणांनी कमी आहे. यामुळं गजरवंतांची शेकडो लेकरंबाळं पायावर उभारली असती. त्यांचं आयुष्य जरांगे व त्यांच्या आकांनी उध्वस्त केलंय. आम्ही ओबीसी बांधव आतडी तुटोसतर ओरडून सांगतोय बलूता अलुता सामाजिक मागास यांच्या स्पर्धेत कसा टिकेल हो !
जरांगेंचा सगळा खटाटोप राजकीय आरक्षणासाठी होता यात बळी मात्र ओबीसीचा आणि भटक्या जातसमूहाचा गेलाय, घटनेमधील सामाजिक न्याय देण्याचं बाबासाहेबांच स्वप्न या एका जी आर द्वारे आपण संपवलाय. ता. क.
ओबीसी तुम्हाला धक्का न लावता इथून पुढे मतदान करतील! -लक्ष्मण हाके
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App