MP Naresh Mhaske : ‘’ विरोधकांच्या ‘इंडि’ आघाडीचे नाव ‘औरंगजेब फॅन क्लब’ असायला हवे’’

MP Naresh Mhaske

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी असे का म्हटले जाणून घ्या?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : MP Naresh Mhaske शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी लोकसभेत काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीका केली आणि ते औरंगजेबाबद्दल बोलतात, म्हणून त्यांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ नसून ‘औरंगजेब फॅन क्लब’ असावे असे म्हटले. तर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.MP Naresh Mhaske

शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी काँग्रेस राजवटीवर सहकाराच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा आरोप करताना म्हटले की, “आमच्या काळात (भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात) सहकारातून समृद्धी येत होती, तर काँग्रेसच्या राजवटीत शेतकऱ्यांचे पैसे लुटून सहकाराला भ्रष्टाचाराचे अड्डे बनवण्यात आले.



त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक, २०२५ वरील चर्चेत भाग घेताना म्हस्के यांनी आरोप केला की, “ते(विरोधी आघाडी) औरंगजेबाबद्दल बोलणारे लोक आहेत. ज्याप्रमाणे औरंगजेबने ‘जझिया’ कर लादून हिंदूंना नष्ट करण्याचे काम केले, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि ठाकरे गटाने महाराष्ट्रात असंख्य घोटाळे करून देशाला पोकळ केले आहे आणि मग म्हस्के म्हणाले की, “मला वाटते की त्याचे नाव ‘इंडि’ आघाडी नसून ‘औरंगजेब फॅन क्लब’ असावे.” विरोधी सदस्यांनी त्यांच्या टिप्पणीवर आक्षेप घेतला.

Shiv Sena MP Naresh Mhaske said The name of the Indi alliance should be Aurangzeb Fan Club

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात