Pakistan : काँग्रेस + अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स आणि पाकिस्तानच्या तोंडी एकच भाषा; काश्मीरमध्ये 370 + 35a परत आणा!!

Pakistan

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यातल्या 24 जागांवर मतदान झाल्याच्या वर्षभूमीवर पाकिस्तानच्या तोंडून 370 आणि 35a ही कलमे परत आणायची भाषा झाली. पण ही भाषा आणि काँग्रेस + फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्स युतीची आश्वासनाची भाषा एकच ठरली. कारण काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीने जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा लागू करण्याचे आणि 35a कलम पुन्हा आणण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. Pakistan

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मेहमूद आसिफ यांनी पाकिस्तान टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत याच मुद्द्यावर भर दिला जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम पाठविल्यानंतर पाकिस्तान काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे एका तोंडाने बोलत होतेच परंतु त्यानंतर देखील या तिन्ही घटकांच्या धोरणांमध्ये समानता होती 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू कश्मीर मधून मोदी सरकारने 370 कलम  फाटविले त्यावेळी पाकिस्तानात इमरान खान यांचे सरकार होते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख “हिटलर” असा करत आगपाखड केली होती. Pakistan

आता पाकिस्तान मध्ये सरकार बदलून शहाबाज शरीफ यांचे सरकार आले तरी पाकिस्तानच्या काश्मीर विषय धोरणात बदल झाला नाही पाकिस्तानचे शहाबाज शरीफ सरकार मधले संरक्षण मंत्री ख्वाजा मेहमूद आसिफ यांनी काश्मीरमध्ये 370 कलम आणि 35a कलम पुन्हा आणण्याची वकालत केलीच, जी वकालत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स च्या जाहीरनाम्यात आधीच करण्यात आली आहे. पाकिस्तान टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी त्याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला. Pakistan

जम्मू काश्मीर मधल्या जनतेने निवडणुकांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला त्यांनी भरघोस मतदान केले याचा अर्थच तिथल्या जनतेला राज्याचा दर्जा पुन्हा हवा आहे 370 कलम आणि 35 एक कलम त्यांना पुन्हा आणायचे आहे, असाच त्याचा अर्थ होतो, असा दावा ख्वाजा आसिफ यांनी केला. यातूनच काँग्रेस + अब्दुल्ला परिवाराची नॅशनल कॉन्फरन्स आणि पाकिस्तान एकाच तोंडाने बोलत असल्याचे उघड्यावर आले. Pakistan

Pakistan and National Conference-Congress alliance are on the same page

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात