मतांसाठी नेत्याने केली हजामत, निवडणुकीसाठी उमेदवाराने मतदाराजाची केली दाढी, व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था

चेन्नई : निवडणुका येताच उमेदवार जनतेला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबतात. काही लोक लोकप्रिय आश्वासने देतात तर बरेच लोक मते मिळविण्यासाठी एक दिवसाचे न्हावी बनण्यास तयार होतात. होय! तुम्ही बरोबर ऐकले. असाच काहीसा प्रकार तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये पाहायला मिळाला. जिथे एक उमेदवार सलूनमध्ये लोकांची दाढी करताना दिसला. एनएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीत उभे असलेले उमेदवार लोकांची दाढी करताना दिसत आहे.Leader shaves for votes, candidate shaves voter’s beard for election, video goes viral



अलीकडेच, ANI ने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तमिळनाडूच्या रामेश्वरममधून अपक्ष उमेदवार परीराजन निवडणूक प्रचारादरम्यान एका दिवसासाठी न्हावी बनल्याचे लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये परिराजन एका पुरुषाची दाढी करताना दिसत आहे. त्या माणसाने चेहऱ्यावर फेस लावलेला दिसतो आणि परिराजन वस्तऱ्याने त्याची दाढी करत आहेत. दाढी केल्यानंतर, परिराजन हात जोडून लोकांना मतदानासाठी आग्रह करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ 28 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक सोशल मीडिया युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, “तो निवडणुकीच्या वेळी जनतेचा खरा सेवक बनण्याचा प्रयत्न करत आहे, पण जिंकल्यानंतर तो दिसणार नाही आणि स्वत:ला सम्राट समजू लागेल.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “हे लोक निवडणुकीपर्यंत सर्व काही करतील, निवडणुकीनंतर म्हणतील- तुम्ही कोण?”

Leader shaves for votes, candidate shaves voter’s beard for election, video goes viral

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात