संसद भवनात घुसखोरीचा कट रचल्याप्रकरणी आरोपींची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींपैकी एक असणाऱ्या सागर शर्मा याने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे.There was a plan to commit suicide outside Parliament but it was foiled Disclosure of the accused Sagar before the police!
स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरने संसद भवनाबाहेर आत्मदहनाची योजना आखल्याची कबुली दिली. मात्र नंतर ही योजना रद्द करण्यात आली. सागरने स्पेशल सेलला सांगितले की जेल सारखा पदार्थ ऑनलाइन खरेदी करण्याचा विचार होता, जो आगीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शरीरावर लावता येतो. मात्र ऑनलाइन पेमेंट न झाल्याने तो जेल खरेदी करू शकला नाही. यामुळे आरोपींनी संसदेबाहेर स्वतःला पेटवून घेण्याचा प्लॅन रद्द केला.
संसद भवनात घुसखोरीचा कट रचल्याप्रकरणी आरोपींची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला ललित झा हा संपूर्ण कटाचा सूत्रधार असल्याचे दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी स्थानिक न्यायालयात सांगितले.
त्याला आणि इतर आरोपींना देशात अराजकता पसरवायची होती. जेणेकरून ते सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू शकतील. 13 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती करण्यासाठी पोलिस संसदेची परवानगी घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App