शाहरूखच्या “पठाण”चे रेकॉर्ड मोडले; प्रभासच्या Adipurush चा 150 कोटींच्या टप्प्यात!!

प्रतिनिधी

मुंबई : प्रभासचा बहुचर्चित बिग बजेट “आदिपुरुष” चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. शुक्रवारी दिवस संपल्यानंतरचे आलेली आकडेवारी चित्रपटाने अपेक्षेपक्षा चांगली कमाई केल्याचं सांगत आहेत. शाहरूखच्या “पठाण”चे रेकॉर्ड मोडत “आदिषुरुष”ने मोठी कमाई केली आहे.

Prabhas’ Adipurush in the 150 crore phase

प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असणारा ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांनी तिकीट बुकिंगसाठी गर्दी केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी गर्दी झाल्याने साईटही क्रॅश झाली होती. ‘रामायणा’चा मॉडर्न अवतार असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी तरी पसंती दिल्याचं चित्र आहे. अॅडव्हान्स बुकिंग पाहिल्यानंतर चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

शुक्रवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे. त्यावरुन प्रभासच्या स्टारडमने चित्रपटाला अपेक्षेपेक्षा चांगली कमाई करण्यात मदत केल्याचं दिसत आहे. ‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभास पॅन इंडिया स्टार झाला असून, त्याचा फायदा आदिपुरुष चित्रपटाला झाला आहे. प्रभासला तेलुगू प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. आदिपुरुष चित्रपटाचं ओपनिंग कलेक्शन पाहता हिंदीपेक्षा तेलुगू व्हर्जनमध्ये जास्त कमाई झाली आहे.

‘आदिपुरुष’चं हिंदी कलेक्शन

अॅडव्हान्स बुकिंगच्या आधारे अंदाज लावला जात होता की, ‘आदिपुरुष’च्या हिंदी व्हर्जनला 30 ते 32 कोटींपर्यंत ओपनिंग मिळेल. पण ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने दुपारच्या आणि संध्याकाळाच्या शोला चांगली गर्दी जमवली होती. त्यामुळे ही कमाई सहज 35 कोटींपर्यंत पोहोचू शकते. अंतिम आकडेवारीत ओपनिंग कलेक्शन 40 कोटींजवळ जाऊ शकतं. मात्र हिंदीच्या तुलनेत तेलुगूमध्ये जास्त पसंती मिळत आहे.

150 कोटींची ओपनिंग

‘आदिपुरुष’ने अॅडव्हान्स बुकिंमधूनच जवळपास 30 कोटींची कमाई केली होती. भारतात चित्रपट सहजपणे 75 ते 80 कोटींची कमाई करेल असा अंदाज होता. पण शुक्रवारी आलेल्या बॉक्स ऑफिसच्या रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ने त्यापेक्षा चांगली कामगिरी केलीआहे.

‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी एकूण 87 ते 90 कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे. महत्त्वाचं म्हणजे मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रीनवरही चित्रपट जोरदार कमाई करत आहे. ट्रेड रिपोर्टनुसार, लोकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला असून पहिल्या विकेंडला चांगली कमाई होईल.

‘आदिपुरुष’चा बॉक्स ऑफिसवरील वेग पाहता जर चित्रपटाची भारतातील अंतिम कमाई 90 कोटींच्या पुढे गेली तरी आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे फक्त भारतातच ‘आदिपुरुष’ची एकूण कमाई 110 कोटींपर्यंत असेल.

परदेशातही जबरदस्त कमाई

बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, परदेशात जवळपास 2200 स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचं ओव्हरसीज कलेक्शन 35 ते 40 कोटींपर्यंत असू शकतं. म्हणजे भारत आणि परदेशातील एकूण कमाई पाहता ‘आदिपुरुष’चं वर्ल्डवाइड कलेक्शन 150 कोटींपर्यंत पोहोचू शकतं.

दरम्यान प्रभासने पहिल्या दिवसाच्या कमाईत शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. प्रभासने शाहरुखच्या ‘पठाण’ला 25 कोटींनी मागे टाकलं आहे.

Prabhas’ Adipurush in the 150 crore phase

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात