ताजमहाल नव्हे तेजोमहालय, जलाभिषेकाने शुध्दीकरण करण्याचा प्रयत्न, अयोध्येतील छावणी तपस्वी आखाड्याचे जगद्गुरू परहंसाचार्य यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

अक्षय्य तृतीयेपासून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची तयारी सुरू होईल. याहून चांगला मुहूर्त असू शकत नाही. यासाठी तेजोमहालयाचे म्हणजे ताजमहालाचे शुद्धीकरण करण्यासाठी जलाभिषेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अयोध्येतील छावणी तपस्वी आखाड्याचे जगद्गुरु परमहंसाचार्य यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. Attempt to purify Tejomahalaya by water anointing, not Taj Mahal


विशेष प्रतिनिधी

आग्रा : अक्षय्य तृतीयेपासून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची तयारी सुरू होईल. याहून चांगला मुहूर्त असू शकत नाही. यासाठी तेजोमहालयाचे म्हणजे ताजमहालाचे शुद्धीकरण करण्यासाठी जलाभिषेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अयोध्येतील छावणी तपस्वी आखाड्याचे जगद्गुरु परमहंसाचार्य यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

परमहंसाचार्यांनी ताजमहालात भगवी वस्त्रे घालून प्रवेश करण्याची घोषणा केली होती. यासाठी मंगळवारी ते आर्ग्यात पोहोचले होते. भगवी वस्त्रे परिधान करुन एकट्यानेच ताजमहलात जाण्याचा त्यांचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले.करण्याचाही दावा केला. त्यांनी पूर्वेच्या प्रवेशद्वारातून भगवा व ब्रह्मदंडासह प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.
पोलिसांनी त्यांना हिंदुत्ववादी नेते रवी दुबे यांच्या कारमध्ये बसवून ताजमहालाच्या दिशेने नेले. रस्त्यात कैलाश महादेव मंदिराचे महंत निर्मल गिरी यांच्यासह अनेक संतांनी त्यांना घेराव घातला असता त्यांनाही वाहनात बसवण्यात आले.



 

परमहंसाचार्य म्हणाले, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी आम्ही कोणताही संघर्ष करण्यास तयार आहोत. जनतेला ताजमहालाचा चुकीचा इतिहास सांगण्यात आला. त्यांच्या या विधानानंतर आग्र्यातील हिंदू संघटनांनी तीव्र गदारोळ केला. अनेकजण साधूच्या वेषात ताजमहाल परिसरात पोहोचले होते.

परमहंसाचार्यांनी 5 मे रोजी ताजमहालावर धर्म संसद बोलावली आहे. यामुळे प्रशासन सतर्क आहे. दुसरीकडे, एसएसपी सुधीर कुमार यांच्यापासून अनेक अधिकारी ईदमुळेही सावधगिरी बाळगत आहेत. संवेदनशील स्थळी सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आलेत.

पुरातत्व विभागाने या प्रकरणाच्या तपासानंतर परमहंसाचार्यांना ताजमहालात निमंत्रित केले होते. पुरातत्व अधीक्षक आर.के.पटेल यांनी योग्य समन्वयाअभावी त्यांना रोखण्यात आल्याबद्दल माफी मागितली.

Attempt to purify Tejomahalaya by water anointing, not Taj Mahal

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात