विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्या विरोधात मोठा आवाज काढल्यानंतर छेडेंगे तो छोडेंगे नही, असे म्हणत त्यांना धमकी देणारा मतीन शेखानी आता अटकेच्या भीतीने फरार झाला आहे, पण राज ठाकरे यांना आता पुण्यातून दुसऱ्याने धमकी दिली आहे. अजहर तांबोळी असे त्याचे नाव आहे. Raj Thackeray: Matin Shekhani absconding; Now Azhar threatens to play the trumpet !!
मतीन शेख याने मुंबईत मुस्लिमांच्या एका मिरवणूकीत भाषण करताना भोंग्यांच्या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांना धमकी दिली होती. छेडेंगे तो छोडेंगे नही. मशिदींवरचे भोंगे उतरवणार नाही. सुप्रीम कोर्टाचा तसा कोणताही आदेश नाही, असा दावा त्याने केला होता. परंतु त्यानंतर त्याच्याविरोधात पोलीस केस दाखल झाली. त्यामुळे मतीन शेख आणि आता अटकेच्या भीतीने फरार झाला आहे.
शेखानी एकीकडे फरार झाला असताना दुसरीकडे पुण्यातला सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा नेता अजहर तांबोळी यांनी तुम्ही भोंगे उतरवल तर आम्ही तुमचे भोंगे वाजवू, अशी धमकी राज ठाकरे यांना दिली आहे. मतीन शेखानी हा पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयचा नेता होता, तर अझहर तांबोळी हा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा नेता आहे. या दोन्ही पक्षांच्या नावात कुठेही मुस्लिम असा उल्लेख नाही पण यांचे सगळे सदस्य मुस्लिमच असल्याचे दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App