ठाकरे – पवार सरकार, 2 पांडे : रझा अकादमीची इफ्तार पार्टी आणि मनसेने भोंगे!!


या विषयाचे शीर्षक वाचून कुणालाही प्रश्न पडतीलल, ठाकरे – पवार सरकार आणि 2 पांडे यांचा संबंध काय…?? आणि त्यांचा रझा अकादमीची इफ्तार पार्टी आणि मनसेचे भोंगे यांच्याशी देखील संबंध काय…??, पण आहे, निश्चित संबंध आहे…!!

Thackeray – Pawar government, 2 Pandey: Raza Academy’s Iftar party and MNS honking

ठाकरे – पवार सरकारने नेमलेले 2 पांडे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. यापैकी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला काल हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी काल मध्यरात्रीच मनसेच्या भोंग्यांना ते सुरू होण्यापूर्वीच चाप लावून टाकला आहे. हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी “प्रो ऍक्टिव्ह” म्हणून पोलिस वर्तुळात ओळखले जातात.

रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सामील होऊन संजय पांडे यांनी आपला “प्रो ऍक्टिव्हनेस” दाखवून दिला आहे, तर मुख्यमंत्री – गृहमंत्री – पोलिस महासंचालक यांची बैठक होण्यापूर्वीच नाशिक पुरते भोंग्यांवरचे आदेश काढून दीपक पांडे यांनी आपला प्रवास “प्रो ऍक्टिव्हनेस” दाखवून दिला आहे…!!

– रझा अकादमी इफ्तार पार्टीत संजय पांडे

ज्या रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत संजय पांडे काल सामील झाले, हीच ती रजा अकादमी आहे जिच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावरील अमर जवान ज्योती प्रतीकाची मोडतोड केली होती. इतकेच नाही तर अमरावती, नांदेड, भिवंडी, मालेगाव मोर्चा आणि दंगलींमध्ये तिचा सहभाग आढळला होता. या रझा अकादमीवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र सरकार विचार करत आहे, असे उत्तर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिले होते. त्याच रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते. ही घटना बरेच काही “बोलून” जाते…!!

– दीपक पांडेंचा मनसे भोंग्यांना चाप

राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय उपस्थित केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. ठाकरे – पवार सरकारने सुरुवातीला हा विषय झटकून टाकला होता. पण नंतर त्या विषयाची सरकारला दखल घ्यावी लागली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. भोंग्यांच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करा, असे आदेश वळसे-पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले. परंतु असे आदेश येण्यापूर्वीच 12 तास आधी नाशिक मध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी “प्रो ऍक्टिव्ह” भूमिका बजावत मनसेच्या नेत्यांना चाप लावून टाकला. मशिदींच्या 100 मीटरच्या परिसरात कोणीही भोंगे वाजवता कामा नयेत. अन्यथा कारवाई करण्यात येईल आणि 4 महिन्यांचा तुरुंगवास, दंड अशा शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे दीपक पांडे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट करून टाकले आहे.

– भोंगे मार्गदर्शक तत्वे

प्रत्यक्षात मशिदींवरचे भोंगे उतरवण्यास संदर्भात ठाकरे – पवार सरकारची नेमकी भूमिका यातून स्पष्ट होत नाही. भोंग्यांचा डेसिबल कमी ठेवावा. आवाज विशिष्ट वेळेतच आला पाहिजे, अशा आशयाची संबंधित मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार आहेत. यामध्ये “सर्व धार्मिक स्थळे” असा उल्लेख असणार आहे. यातून ठाकरे – पवार सरकार धर्मनिरपेक्ष धोरण अधोरेखित होताना दिसणार आहे. किंबहुना भोंग्यांवरील मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून या धर्मनिरपेक्ष धोरणावर शिक्कामोर्तब करवून घेण्यात येणार आहे…!!

Thackeray – Pawar government, 2 Pandey: Raza Academy’s Iftar party and MNS honking

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात