पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका मुलींच्या शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे शाळेत घुसून एका नराधमाने ११ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.Shocking incident at a school in Pune, 11-year-old girl was raped in a premises of girls’ school
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका मुलींच्या शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे शाळेत घुसून एका नराधमाने ११ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन जिमखाना परिसरात राहणार्या एका ४० वर्षाच्या महिलेची ११ वर्षाची मुलगी जंगली महाराज रोडवरील शाळेत शिकायला आहे. बुधवारी सकाळी ती शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करुन तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.
या घटनेनंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, शाळेत सीसीटीव्ही आहेत. आम्ही तपास करीत आहोत. शाळेत कार्यरत असलेल्या कोणा पुरुषाचे हे काम नाही, याची तपासणी आम्ही केली आहे. हा आरोपी बाहेरचा असल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App