मराष्ट्रामध्ये भाजपा विरूद्ध शिवसेना असलेला वाद आता संजय राऊत विरूद्ध किरीट सौमय्या असा झाला आहे.Face-to-face: Sanjay Raut – Show Thackeray’s 19 bungalows, let’s party together . Rashmi Thackeray pays tax on 19 bungalows? Take my shoe -Kirit Somaiya
संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना मदत करताहेत की मुख्यमंत्र्यांना एक्स्पोज करताहेत ? असा प्रश्न संजय राऊतांना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांच्या १९ बंगले चोरीला गेले का ?की मुख्यमंत्री खोट बोलत आहेत ?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांवर अत्यंत अर्वाच्य भाषेत आरोप केले. ठाकरे कुटुंबाचे अलिबाग मध्ये १९ बंगले असल्याचा दावा खोटा ठरला तर किरीट सौमय्यांना जोड्याने मारा अशा शब्दांत त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर आक्रमण केले. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून किरीट सोमय्या यांनी आज थेट दिल्लीतून पत्रकार परिषद घेत संजय राउत्तांना खुले आव्हान दिले आहे.१९ बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला आहे . त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.Face-to-face: Sanjay Raut – Show Thackeray’s 19 bungalows, let’s party together . Rashmi Thackeray pays tax on 19 bungalows? Take my shoe -Kirit Somaiya
संजय राऊत काय म्हणाले होते ?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा उल्लेख भाजपचे दलाल असा केला होता. तसंच किरीट सोमय्या खोटी माहिती पुरवत आहेत. 19 बंगल्यांबाबत जे वक्तव्य त्यांनी केलं ते खरं असेल तर मी राजकारण सोडून देईन.
खोटं असेल तर मात्र मुलुंडच्या दलालाला जोड्याने मारू असं वक्तव्य संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं होतं.
या सगळ्या आरोपाला किरीट सोमय्यांनी दिल्लीत उत्तर दिलं. एवढंच नाही तर भर पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी जोडाही काढला.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे की, अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जर लिहून दिलं की असं केलेलं नाही तर एक नाही दोन जोडे मारा.
मी माझे जोडे संजय राऊतांना देतो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या पायातील जोडे हातात घेऊन दाखवले.
संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी बंगल्यांचा टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले.
१९ बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले.
२०१३ ते २०२१ या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात?
किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले.
यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे असंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी आपला जोडा काढून मी खोटं बोलत असेल तर संजय राऊत यांनी खुशाल मला माझ्या जोड्याने मारावं असंही म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App