देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले संकेत

 

स्थानिक पातळीवरच मोठय़ा प्रमाणावर लसीकरण आणि प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना या त्रिसूत्रीचे पालन करण्यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.The country will not have a lockdown again, Prime Minister Narendra Modi has indicated


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधानांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.दरम्यान या बैठकीत देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.यावेळी कोरोना महामारी लढाईचे हे तिसरे वर्ष असून आपण ही लढाई जिंकणारच,असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही, असे संकेतही पंतप्रधानांनी दिले.

तसेच स्थानिक पातळीवरच मोठय़ा प्रमाणावर लसीकरण आणि प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना या त्रिसूत्रीचे पालन करण्यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नागरिकांच्या रोजगाराचा विचार करायला हवा.अस देखील मोदी म्हणाले.


लॉकडाऊनच्या भीतीने मुंबईतील मजुरांनी पुन्हा धरला गावाचा रस्ता


तसेच स्थानिक पातळीवरच प्रसार रोखण्यावर भर हवा, तरीही देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असली तरी न घाबरता, त्याविरुद्ध लढा देऊ. विषाणूचा प्रकार कोणताही असला तरी लसीकरण हाच त्याविरुद्ध लढा देण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

The country will not have a lockdown again, Prime Minister Narendra Modi has indicated

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात