मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी, तब्येत बरी व्हावी ही इच्छा – चंद्रकांत पाटील; तूर्त पदभार दुसऱ्याकडे देण्याचा सल्ला

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी, ही आमची इच्छा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सांगितले. तब्येत बरी होईपर्यंत पदभार दुसऱ्याकडे देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. We care about the health of the Chief Minister, we want to get well: Chandrakant Patil; Advise to hand over the charge to others

ते म्हणाले, राज्यात इतके प्रश्न आहेत की, प्रकृती बरी नसल्याने मुख्यमंत्र्याचा चार्ज हा दुसऱ्या कोणाकडे उद्धव ठाकरे यांनी देण्याची गरज आहे. तो कोणाकडेही दिला तरी आमचं काहीही म्हणणं नाही. संजय राऊत यांनी माझ्या आणि पक्षाच्या तब्येतीची काळजी करू नये, असे पाटील यांनी सांगितले.पक्षाचे वरिष्ठ काळजी करायला समर्थ आहेत. मुंबई बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष झाला. मात्र, शिवसेनेच्या उपाध्यक्ष झाला नाही, हे सुद्धा खरे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे, अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी मतं लागतात याची गोळाबेरीज करण्याचा राष्ट्रवादीचा फक्त प्रयत्न आहे. पण शिवसेना असे प्रयत्न का करते हे कळत नाही. संजय राऊत यांचं गोव्यात जे काही चाललंय ते भाजपच्या फायद्याचं आहे, असे ते म्हणाले.

We care about the health of the Chief Minister, we want to get well: Chandrakant Patil; Advise to hand over the charge to others

महत्त्वाच्या बातम्या