महिलांच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या १८ खेळाडूंच्या संघाची निवड , सविता पूनियाची कर्णधारपदी नियुक्ती

स्पर्धेतील अव्वल चार संघ 2022 साली स्पेन आणि नेदरलॅंड्‌स येथे होणाऱ्या विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरतील.India’s 18-man squad for Asia Cup women’s hockey tournament, Savita Poonia appointed captain


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मस्कत येथे होणाऱ्या महिलांच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या 18 खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात आली आहे.नियमित कर्णधार राणी रामपाल हिला दुखापत झाल्याने तीचा समावेश करण्यात आलेला नाही.त्यामुळे अनुभवी गोलकीपर सविता पुनियाकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

21 ते 28 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सविताची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.हॉकी इंडियाने जाहीर केलेल्या संघात यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या 16 खेळाडूंचा समावेश आहे.महिला खेळाडूंची नावे

सविता पुनिया (गोलरक्षक, कर्णधार), रजनी एतिमार्पू, दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता, निशा, सुशीला चानू, मोनिका, नेहा, सलीमा टेटे, ज्योती, नवज्योत कौर, नवनीत कौर, लालरेम्सियामी, वंदना कटारिया, मारियाना कुजूर, शर्मिला देवी.

21 ते 28 जानेवारी दरम्यान होणार स्पर्धा

भारताला जपान, मलेशिया आणि सिंगापूरसह अ गटात स्थान देण्यात आले आहे.स्पर्धेतील अव्वल चार संघ 2022 साली स्पेन आणि नेदरलॅंड्‌स येथे होणाऱ्या विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरतील.भारतीय संघ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मलेशियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

यानंतर भारताचे सामने जपान (23 जानेवारी) आणि सिंगापूर (24 जानेवारी) असे होणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने 26 जानेवारीला, तर अंतिम सामना 28 जानेवारीला होणार आहे.

India’s 18-man squad for Asia Cup women’s hockey tournament, Savita Poonia appointed captain

महत्त्वाच्या बातम्या