लेस्बियन असल्याचे भासवून तरुणाने घातला अनेकींना गंडा, फोटो मागवून केले ब्लॅकमेल

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू: सोशल मीडियावर आपण लेस्बियन तरुणी असल्याचे भासवून अनेक तरुणींना फसवून पैशासाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला पोलिसांनी बंगळुरू अटक केली. बनावट अकाऊंट बनवून तो अनेक तरुणींना जाळ्यात ओढले होते.Pretending to be a lesbian, the young man blackmailed many girls by asking for photos

प्रपंच नचप्पा (21) असे अटक केलेल्याचे नाव असून तो फ्रेझर टाउनचा रहिवासी आहे. तो एका खासगी महाविद्यालयात बीएससीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने सप्टेंबर 2021 मध्ये एका महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते बनविले. त्याद्वारे सुमारे 30-40 तरुणींना ब्लॅकमेल करून पैसे उकळले.प्रपंच सोशल मीडियावर स्वत: एक तरुणी असल्याचे भासवत असे. आपण लेस्बियन असून दोन महिलांमधील संबंध समाजाला मान्य नसतात. त्यामुळे आपल्याला खूप शरम वाटते असे तो सांगत असे. अनेक महिलांना फेक अकाऊंटवरून फॉलो रिक्वेस्ट पाठवित होता. आपण मॉडेलिंग क्षेत्रात असून ज्यांना या क्षेत्रात यायचे आहे त्यांना मदत करू असेही प्रलोभन दाखवित असते.

एका तरुणीला त्याने प्रतिक्षा या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. आपल्याला लेस्बियन जोडीदार हवा असल्याचे त्याने सांगितले. विश्वास बसावा यासाठी त्याने दुसºयाच एका तरुणीचे दोन नग्न फोटोही या तरुणीला पाठविले. या तरुणीलाही त्याने नग्न फोटो पाठवण्याचा आग्रह केला.

प्रत्येक फोटोसाठी चार हजार रुपये देण्याचे आमिषही दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून मुलीने त्याला काही फोटो पाठवले. पण लवकरच, तिच्या लक्षात आले की हा एक सापळा आहे. त्यामुळे तिने त्याला ब्लॉक केले.

त्यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवर दुसरे खाते तयार करून पैसे उकळण्यासाठी तिला मेसेज केला. पैसे न दिल्यास तिचे फोटो प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

Pretending to be a lesbian, the young man blackmailed many girls by asking for photos

महत्त्वाच्या बातम्या