आता तरी जागे व्हा, कोरोनाची तिसरी लाट आली, उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला सुनावले

विशेष प्रतिनिधी

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट आली असतानाही थंड बसलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आता उच्च न्यायालयाने स्वत:हूनच सुनावले आहे. कोरोनाची तिसरी लाट आली असताना राज्य सरकार आणि हाफकीन संस्थेनं आतातरी जागं व्हावे, असे म्हटले आहे.Now wake up though, the third wave of corona has come, the High Court has ordered the Mahavikas Aghadi governmentन्यायालयाने म्हटले आहे की, कोरोनाची तिसरी लाट आली असताना सरकारी रुग्णालय अजूनही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करत नाही. सात दिवसात वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करावा. अन्यथा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी स्वत: न्यायालयात हजर राहावे.

राज्य सरकारने सरकारी रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरवले नसल्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली.

Now wake up though, the third wave of corona has come, the High Court has ordered the Mahavikas Aghadi government

महत्त्वाच्या बातम्या