लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा; डॉ. प्रतीत समदानी यांची माहिती

प्रतिनिधी

मुंबई : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे आली. शुक्रवारी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे.A slight improvement in Lata Mangeshkar’s condition

गेल्या शनिवारपासून लता मंगेशकर यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र याबाबत मंगळवारी जाहीर करण्यात आले. उपचारादरम्यान लतादीदींना न्यूमोनियाचीही लागण झाली. पाहिल्या दिवसापासून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा दिसून येत नाही, तोपर्यंत रुग्णालयातच ठेवले जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

डॉक्टरांची टीम लतादीदींच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. कोरोनासह त्यांना न्यूमोनियाही झाला आहे. लता मंगेशकर यांना 12 दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करावी, अशी विनंती लता मंगेशकर यांची भाची रचना हिने केली आहे. लता मंगेशकर यांच्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून प्रार्थना केली जात आहे.

A slight improvement in Lata Mangeshkar’s condition

 

महत्त्वाच्या बातम्या