WATCH : संगमनेरच्या गाईची राज्यामध्ये चर्चा एक लाख एकतीस हजारांचा भाव ; शेतकरी मालामाल

 

विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविल्याने बैल जोडीचे भाव वाढले आहेत. मात्र, कल्याणी नावाच्या एका गाईला चक्क एक लाख एकतीस हजारांचा भाव मिळाला आहे. Sangamner’s cow Discussion in the state; sold at the Price of one lakh thirty one thousand

संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्दे गावचे शेतकरी योगेश ढोकरे यांच्या मालकीची ही गाय आहे.

वाघापुर गावचे शेतकर विश्वास रकटे यांनी ती खरेदीही केली आहे. ही एक संकरीत जातीची ही गाय असून ती आठ महिन्यांची गाभणही आहे.ती ३५ ते ४० लिटर दूध देते. आहारात शेंगदाणे, सरकी पेंड, मका भरडा, घास, गवत, गव्हाचा भरडा, गोळीपेंड असा आहार आहे. कल्याणीवर लाखोंची बोली लावल्यामुळे आज शेतकरी योगेश ढोकरे व कुटुंबीय लखपती बनले आहेत.

  •  संगमनेरच्या गाईची राज्यामध्ये चर्चा
  •  संकरित गाय असल्याने चांगला भाव मिळाला
  •  दिवसाला ३५- ४० लिटर दुध देते
  • एक लाख एकतीस हजारांची बोली
  •  शेतकरी योगेश ढोकरे व कुटुंबीय मालामाल

Sangamner’s cow Discussion in the state; sold at the Price of one lakh thirty one thousand