लेस्बियन जाहिरातीसाठी डाबर कंपनीने स्टँड घेतला नाही म्हणून अभिनेत्री पूजा भट्टने कंपनीची केली निंदा


विशेष प्रतिनिधी

मुबंई : 6 सप्टेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 असंवैधानिक असून भारतात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता दिली होती. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर (LGBT) यांच्या हक्कासाठी भारत विकसित होत आहे असे दिसत आहे. पण तरीही भारतामध्ये अजूनही एलजीबीटी नागरिकांना म्हणावी तशी सामाजिक मान्यता मिळत नाही आणि त्यांना बऱ्याच कायदेशीर अडचणींना देखील सामोरे जावे लागते.

Actress Pooja Bhatt slammed Dabur for not taking a stand for lesbian advertising

नुकताच करवा चौथच्या निमित्ताने डाबर कंपनीने एका फेअरनेस क्रीमच्या अॅडमध्ये लेस्बियन कपल करवा चौथचा व्रत करते आहे असे दाखवले होते. ही जाहिरात प्रसारित झाल्यानंतर प्रेक्षक मात्र भरपूर संतापले. त्यांनी या कंपनीच्या प्रोडक्टवर, त्यांच्या अॅडवर टीका केली. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर डाबर कंपनीच्या इतर प्रोडक्ट्सना बॉयकॉट करण्याचा एक ट्रेंड सुरू झाला. यानंतर कंपनीने ही जाहिरात प्रत्येक सोशल मिडीया प्लँटफॉर्मवरून काढली आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत लोकांची माफी देखील मागितली.


वादग्रस्त : डाबरने केली लेस्बियन करवा चौथची जाहिरात, नेटकऱ्यांच्या संतापानंतर मागितली जाहीर माफी


या सर्व प्रकारानंतर अभिनेत्री पूजा भट्ट मात्र चांगलीच संतापली आहे. तिने ट्विटर हॅन्डलचा आधार घेत डाबर कंपनीला फटकारले आहे. पूजा आपल्या ट्वीटमध्ये लिहिते, ‘बस यही करते रहो…स्लॅम,बँम, बँन. डाबर सारखी इतकी मोठी कंपनी त्यांच्या जाहिरातीच्या मागे उभी राहत नाही हे चुकीचे आहे. मी कोणत्याही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीला मान्यता देत नाही. पण डांबर कंपनीने त्या जाहीराती मधून सर्वसमावेशकता आणि अभिमान या गोष्टींना सेलिब्रेट करण्याचे ठरवले होते. तर कंपनी आपल्या जाहिरातीला का सपोर्ट करत नाही?’ असे ट्वीट करुन पूजाने आपले मत व्यक्त केले आहे.

Actress Pooja Bhatt slammed Dabur for not taking a stand for lesbian advertising

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात