साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे ; शिवेंद्रराजे यांचा घणाघात , DCC बँक आणि पालिकेवरून वाढला वाद


खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी १० तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे, असे आवाहन केलं.Oxygen comes to Satara because of Udayan Raje; Shivendra Raje’s quarrel with DCC Bank and the municipality escalated


विशेष प्रतिनिधी

सातारा : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात DCC बँक आणि पालिकेवरून वाद वाढला आहे. आज (दि. २६ ) खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी १० तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे, असे आवाहन केलं.

दरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की , ” आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता तो सुध्दा मीच सुरू केला आहे, असे स्टेटमेंट उदयनराजेंकडून येईल.”



सर्वपक्षीय पॅनेलमध्ये खासदार उदयनराजेंना घेणार का? असा प्रश्न शिवेंद्रराजे यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, मीच पॅनेलमध्ये आहे का हे मलाच माहीत नाही. पॅनेलचा निर्णय शरद पवार, अजित पवार व रामराजे नाईक- निंबाळकर घेतील.

सातारा जिल्हा बँकेत काल शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यात आलेले आहेत. यामध्ये मी तसेच राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत अद्याप पॅनेलचे कोणतेही नाव नाही तसेच हे पॅनल पक्षविरहित असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

Oxygen comes to Satara because of Udayan Raje; Shivendra Raje’s quarrel with DCC Bank and the municipality escalated

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात