मुंबई विमानतळावर दीड कोटी रुपयांचे सोनं जप्त, स्मगलिंगची पद्धत तर निराळीच , वाचा नेमक सोनं आणल कस ?


२५ ऑक्टोबर रोजी ७० लाख आणि २४ ऑक्टोबर रोजी २५ लाखापेक्षा जास्त मूल्य असलेले सोने जप्त करण्यात आलेले आहे.Gold worth Rs 1.5 crore seized at Mumbai airport, smuggling method different


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसांत सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने पकडण्यात आले आहे. कस्टम एअरपोर्ट इंटेलिजन्स युनीटच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करीचा भंडाफोट केला आहे.२५ ऑक्टोबर रोजी ७० लाख आणि २४ ऑक्टोबर रोजी २५ लाखापेक्षा जास्त मूल्य असलेले सोने जप्त करण्यात आलेले आहे.

मुंबई विमानतळावर स्मगलिंगसाठी आणलेलं तब्बल 2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. हे सोनं विमानाच्या सीटखाली ओल्या कचऱ्याच्या स्वरुपात ठेवण्यात आलं होतं. मुंबईतील कस्टम विभागाला या मोडस ऑपरेंडीची कल्पना आल्यानंतर त्यांनी योग्य पावलं उचलत सोनं जप्त केलं.



विमानाच्या सीटखाली लपवून आणल सोन

अबुधाबीतून मुंबईला आलेल्या इत्तेहाद एअरलाईन्सच्या विमानात तब्बल 2 किलो सोन्याची पेस्ट ठेवण्यात आली होती. विमानाच्या सीटखाली जिथं सेफ्टी जॅकेट्स ठेवलेले असतात, तिथे हे सोनं लपवून ठेवण्यात आलं होतं. एका व्यक्तीच्या पँटला या सोन्याची पेस्ट आतून लावण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या व्यक्तीला पकडून सोनं जप्त केलं आहे.

सफाई कर्मचारी या कटात सहभागी

अबुधाबीहून एका प्रवाशाने हे सोनं आणलं होतं आणि विमानाच्या सीटखाली लपवून ठेवलं होतं. विमानाची साफसफाई करण्यासाठी येणाऱ्या स्टाफपैकी कुणीतरी हे सोनं विमानातून बाहेर काढणार होता. आतापर्यंतच्या मोडस ऑपरेंडीनुसार या कटात सहभागी असणारा सफाई कर्मचारी ते सोनं विमानातून बाहेर काढत असे, ती ओली पेस्ट आपल्या ट्राऊझरला लावत असे आणि विमानतळावरून आपली ड्युटी संपवून बाहेर येत असे.

कस्टम विभागाला मिळाली कल्पना

विमानतळ समन्वयाच्या माध्यमातून अबुधाबीतून पेस्टच्या स्वरुपातील सोनं भारतात येत असल्याची टीप कस्टम विभगाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावला होता. आपल्या ट्राऊझरच्या आतमध्ये सोन्याची पेस्ट लावून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तपासलं आणि त्याला अटक केली आहे.

या प्रकरणी तपास सुरू

विमानचा स्टाफ आणि विमानतळावरचा स्टाफ या दोन्ही ठिकाणचे कर्मचारी या कटात सहभागी असतील, असा संशय कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना अहे. मात्र चोरीचा हा पॅटर्न कस्टम विभागानं शोधून काढला आणि तो पकडला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Gold worth Rs 1.5 crore seized at Mumbai airport, smuggling method different

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात