STORY Behind SAMNA Editorial:खबरदार महाराष्ट्रात ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कारवाई कराल तर…निष्पाप रिया-आर्यनसारख्या मुलांना छळाल तर … ठाकरे-पवार सरकार हे ‘उपद्व्याप’ खपवून घेणार नाही …!


आज शिवसेनेच मुखपत्र सामनातून संजय राऊत यांनी ड्रग्ज-चरस-गांजा सारख्या अंमली पदार्थांच सेवन करणार्या किंवा ते पुरवणार्या स्टारकिड्सला ‘मुलं’तर NCB भारतीय प्रशासकीय सेवकांना ‘घबाडबाज’ असे म्हण्टले आहे. STORY Behind SAMNA Editorial: Beware, if you take action against those who carry drugs in Maharashtra … if you harass innocent children like Riya-Aryan … Thackeray-Pawar government will not tolerate this ‘subversion’ …!


माधवी अग्रवाल

औरंगाबाद : सामनातून बाण चालवणाऱ्या संजय राऊत यांनी आज बॉलिवूडवर वरदहस्त ठेवत स्टारकिड्सला ‘नाहक’त्रास देणार्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांच्यावर थेट अचूक निशाना साधला आहे.राऊत म्हणतात* 1ग्रम चरस घेतले म्हणून काय त्यांना तुरूंगात टाकायचं?आर्यन प्रकरणात’वसुली’ करण्यासाठीच हा बनाव रचल्याचे राऊत म्हणतात मात्र 100 कोटी वसुली प्रकरणावर ते गप्प असतात.रिया चक्रवर्ती प्रकरणात चौकशी करणे हे NCB चे काम नाही असं देखील यात म्हटलं आहे.

समीर वानखेडे दोषी असतील तर चौकशी होईलच मग तुमचेच मंत्री त्यांच्या कुटूंबाला धारेवर का धरताय.ही कारवाई थांबावी म्हणून त्यांच्यावर दबाव का टाकला जातोय ?आणि महाराष्ट्रात कारवाई करण्या आधी NCB ने ठाकरे-पवार सरकारची परवानगी घ्यावी का?

कारवाई करणे म्हणजे उपद्व्याप असतो का?

शिवसेनेनं सामना अग्रलेखातून आर्यन खान, ड्रग्ज पार्टी प्रकरण आणि एनसीबीच्या कारवाईबद्दल भाष्य केलं आहे. ‘भारतीय जनता पक्षाचा जन्म काही पवित्र झग्यातून झालेला नाही. हा पक्षसुद्धा इतर राजकीय पक्षांप्रमाणे हाडा-मांसाचाच बनलेला आहे. त्यांचेही पाय मातीचेच आहेत. हे त्यांच्या प्रमुख लोकांनी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे सत्तेची तागडी वरखाली होतच असते, हे त्यांनी विसरू नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या पक्षाने महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला आहे त्यातले एक एक प्रकरण त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. त्यातले नवे प्रकरण म्हणजे कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीतले उपद्व्याप.’स्टरकिड्स निष्पाप-अधिकारी घबाडबाज??

‘या क्रुझवर काही तरुण पोरांनी अमली पदार्थांचे सेवन केले किंवा बाळगले. सत्य काय ते त्या धाडबाज व घबाडबाज अधिकाऱ्यांनाच माहीत. त्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगाही सापडला. खानचा मुलगा आर्यन याच्यामुळे या प्रकरणास वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे व त्या प्रसिद्धीमुळे एनसीबीचे उत्सवमूर्ती अधिकारी बेबंद आणि बेभान झाले. सुशांतसिंगसिं राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्या संपूर्ण प्रकरणास अमली पदार्थ व्यवहाराचा रंग चढवणारे व त्यात रिया चक्रवर्तीस तुरुंगात पाठविणारे हेच अधिकारी होते.’

रियाने सुशांतला ड्रग्ज पुरवले म्हणून ती गुन्हेगार होते का?

‘रियाकडे कोणतेही अमली पदार्थ मिळाले नव्हते. सुशांत अमली पदार्थांचे सेवन करीत होता हे खरे. हे पदार्थ देणाऱ्या-घेणाऱ्यांना रियाच्या बँक खात्यातून चार हजार रुपये गेले होते. या चार हजारांची किंमत म्हणून रियाला महिनाभर तुरुंगात राहावे लागले. चार हजार रुपयांच्या अमली पदार्थाची चौकशी करणे हे ‘एनसीबी’चे काम नाही. त्यासाठी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र अमली पदार्थविर्थविरोधी पथक आहे व मुंबईचे पोलीस अधूनमधून कोटय़वधी रुपयांचा ‘माल’ पकडत असतात व नष्टही करतात, पण ते फालतू प्रसिद्धीसाठी उद्योग करीत नाहीत. जे रिया चक्रवर्ती आणि आर्यन खान प्रकरणात सध्या सुरू आहे.’

ठाकरे-पवार सरकारला गुजरातची चिंता?मुंबईतील 1ग्रम चरस is not a big deal….

कॉर्डेलिया क्रुझवर एक-दोन ग्रॅम अमली पदार्थ सापडले व त्याचा मोठा उत्सव एनसीबीच्या समीर वानखेडे नामक अधिकाऱ्याने केला. त्याच दरम्यान गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर 3500 किलोचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत 25 हजार कोटी इतकी आहे. या बंदराचे मालक उद्योगपती अदानी आहेत. त्यामुळे त्याबाबतीत 3500 किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले. हे इथे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे!’

ड्रग्ज घेणार्या निष्पाप मुलांवर कारवाई करून त्यांना चिखलात ढकलू नका

‘जे मुंद्रा पोर्टवरील 3500 किलो हेरॉईनचे प्रकरण कधी आले व संपले ते कळलेच नाही, पण 1 ग्रॅम चरस प्रकरण सुरूच आहे व आर्यन खानसह काही मुले तुरुंगात आहेत. कायदेपंडित सांगतात, संपूर्ण प्रकरण व मूळ पुरावे पाहता हे प्रकरण जामीन मिळावा असेच आहे. अशा प्रकरणात फसलेल्या मुलांना योग्य मार्गावर आणा. त्यांना योग्य ती शिक्षा करा. पुनः पुन्हा त्याच चिखलात ढकलू नका, असे आपला कायदा सांगतो, पण तसे घडल्याचे दिसत नाही.

समीर वानखेडेंच्या कारवाया आधी धडाकेबाज होत्या मग आता बॉलिवूडवर कारवाई करताच घबाडबाज?

या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले समीर वानखेडे यांच्या आधीच्या कारवाया धाडसी होत्या हे सगळे ठीक, पण शेवटी कायद्याची चौकट पाळावीच लागेल. त्यात गफलत झाली की कारवाई वादग्रस्त ठरते. ते संशयाच्या भोवऱ्यात सापडते. तेव्हा आपल्या कारवाया वादग्रस्त का ठरत आहेत, याचा शोध ज्याने त्याने घ्यायला हवा. पुन्हा अशा कारवाईवर टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने प्रत्येकाला दिला आहे.’

यानिमत्ताने काही प्रश्न-

  • यापुढे महाराष्ट्रात कारवाई करावी की नाही ?
  • चरस गांजा बाळगणे-पुरवणे म्हणजे गुन्हा नव्हे का ?
  • स्टारकिड्सला सर्व गुन्हे माफ करावेत का?
  • भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याने कारवाई करण्यापुर्वी स्वतःच्या जात प्रमाणपत्रासह बायोडाटा पब्लिश करावा का?

वसुली कोण करतयं?

  • कायदा काय सांगतो हे आर्यन प्रकरणातील न्यायाधीशांना माहिती नसेल का? ते उगाच आर्यनचा जामीन फेटाळतं आहेत का?
  • ‘वसुली’ करणार्यांच्या हाती पक्षाच्या नाड्या आहेत-कोणत्या?वसुली कोण करतं?

100 कोटी वसुलीचे काय ?या वसुलीचे मालक कोण ? नोकर कोण?

खोटे साक्षीदार, बेताल बडबड, बँकांना, सार्वजनिक संस्थांना हजारो कोटींचा गंडा घालून पुन्हा आर्यन खानसारख्या प्रकरणातही ‘वसुली’ करणाऱ्यांच्या हाती पक्षाच्या नाड्या आहेत. या नाड्यांची गाठ कधीही सैल होईल व उघडे आहेत ते नागडे होतील. 25 कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे!’, असा इशारा ठाकरे-पवार सरकारने दिला आहे.

STORY Behind SAMNA Editorial : Beware, if you take action against those who carry drugs in Maharashtra … if you harass innocent children like Riya-Aryan … Thackeray-Pawar government will not tolerate this ‘subversion’ …!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती