अनंत गीते बंडाच्या पवित्र्यात? गीते समर्थकांचे राजीनामे


शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट टीका केली होती. शरद पवार यांना त्यांनी अंगावर घेतले. त्यामुळे शिवसेना नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. Shivsena Ex MP Anant Gite’s close resigned their Shivsena posts


प्रतिनिधी

रत्नागिरी : शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांचे समर्थक शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, खेडचे तालुकाप्रमुख दत्ताराम गोठले आणि युवा सेना तालुका अधिकारी विकास जाधव या चौघांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या चार प्रमुख कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यामुळे अनंत गीते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या अनंत तरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. त्यानंतर राज्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केल्याने तरे यांना स्वतःचा मतदारसंघ गमावण्याची शक्यता वाटू लागली आहे.त्यामुळेच ते नाराज असल्याची चर्चा आहे.



अनंत गीते शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रायगड-रत्नागिरीत गेल्या महिन्या भरापासून चालू आहे. त्यातच तरे यांच्या जवळच्या चौघांनी राजीनामा दिल्याने येत्या काही काळात शिवसेनेत राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरे यांच्या प्रमाणेच माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे तेही उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतून उतरले असल्याची चर्चा आहे. कदम यांना पक्षाने अंतर दिल्याने कदम देखील काय भूमिका घेणार, याबद्दल उलटसुलट चर्चा आहे.

रायगड जिल्ह्यात एका कार्यक्रमात अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करताना पवार आमचे नेते होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. ‘राष्ट्रवादी’सोबत आघाडी करुन शिवसेना सत्तेत असताना गीते यांनी अशी टीका करणे चुकीचे असल्याची नाराजी ‘राष्ट्रवादी’ने व्यक्त केली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे किंवा सेनेतील अन्य कोणत्याही नेत्याने मात्र अजून यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर गीते शिवसेनेतून बाहेर पडणार का अशी चर्चा सुरू आहे. त्यातच मंगळवारी चार पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांकडे राजीनामा दिला आहे. या राजीनाम्या मागचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.

Shivsena Ex MP Anant Gite’s close resigned their Shivsena posts

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात