विशेष प्रतिनिधी
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आई आणि स्मृती इराणी यांच्या बाबत सोशल मीडियवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांच्या घरी जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यांचा निषेध केला.Social worker Mahendra Mone mouth was blackned
या प्रकरणी महेंद्र मोने यांनी हात जोडत माफी मागितली आहे. ठाण्यातील नौपाडा भागात त्यांच्या राहत्या घरी काल रात्री भाजप महिला अध्यक्षा मृणाली पेंडसे सह इतर महिला पदाधिकारी धडकल्या आणि पोस्टबाबत जाब विचारत त्यांच्या तोंडाला काळे फासून जोरदार निषेध केला. दरम्यान, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे मोने यांनी सांगितल्याने प्रकरणावर पडदा पडला आहे.
https://youtu.be/Fc0-KSEjZ28
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App