विशेष प्रतिनिधी
सोलापूर : परिवहनमंत्री अनिल परब यांच्य असंवेदनशिलतेचा एका एसटी कर्मचाऱ्याने स्वत:च्या अंगठ्याने रक्ताभिषेक करत निषेध केला आहे. सोलापूर दौऱ्यावर यांनी एसटीमधील आत्महत्या केलेल्या कर्मचाºयांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सात्वन न करता ते देवदर्शनाला गेले.Instead of meeting the families of the deceased ST employees Anil Parab went to temple, ST workers protested by cutting off thumb and anointing Parab’s image with blood.
संतप्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने परब यांच्या प्रतिमेला स्वत:चा अंगठा कापून रक्ताभिषेक करत निषेध केला.एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी दुखवटा करीत आहेत. परब यांनी सोलापुरात आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या घरी न जाता देव दर्शन घेतले. परब यांना कर्मचाचे रक्त महत्त्वाचे असेल तर त्यांना आम्ही रक्ताचा अभिषेक घालू,
असे म्हणत एसटीमधील वाहतूक नियंत्रक मनोज मुदलीयार यांनी आपला अंगठा कापून घेत परब यांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावत अभिषेक केला. यापुढे दुखवटा आंदोलन आपण आणखी तीव्र करू, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App