ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता, हे लसीकरण तात्काळ करून मोहिमेची अंमलबजावणी करावी, अशा सूचना विभागाने केल्या आहेत.Individuals who have not been vaccinated should be traced and vaccinated; Suggestions made by Zilla Parishad Health Department
विशेष प्रतिनिधी
पुणे : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लसिकरणाबाबत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची शोधमोहीम सुरू केली आहे.दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढावा. यासाठी लस न घेतलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना केल्या आहेत.ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता, हे लसीकरण तात्काळ करून मोहिमेची अंमलबजावणी करावी, अशा सूचना विभागाने केल्या आहेत.
करोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गावातील स्थलांतरीत, मृत, लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले या सगळ्यांची वर्गवारी तयार करण्यात येणार आहेत.दरम्यान गावनिहाय मोहीम राबविताना ज्या व्यक्तींनी अद्याप लस घेतली नाही, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना लस देण्याची विशेष मोहीम राबविण्यात यावी,अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यानुसार तालुका आरोग्य प्रमुख यांना सूचना दिल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App