देशवासीयांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस; मोदींच्या निर्णयावर राहुल गांधी खुश!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशवासीयांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी खूश झाले आहेत. त्यांनी ट्विट करून मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. Corona preventive booster dose to countrymen

केंद्र सरकारने माझा सल्ला मान्य केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ते कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देणार आहेत. हा अतिशय योग्य निर्णय आहे, अशा शब्दात मध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. 22 डिसेंबर रोजी राहुल गांधींनी ट्विट करून देशातली बहुसंख्य जनतेचे अजून लसीकरण पूर्ण झालेले नाही. केंद्र सरकार बुस्टर डोस कधी देणार?, असा सवाल केला होता.

त्यानंतर काल अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी रात्री अचानक देशाला संबोधित करून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. आज सकाळी राहुल गांधी यांनी या घोषणेचे स्वागत केले. केंद्र सरकारने माझा सल्ला मानला आहे. बूस्टर डोस देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. हा अतिशय योग्य निर्णय आहे, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Corona preventive booster dose to countrymen

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात