विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Devendra Fadnavis महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थखाते सोपवले जाणार असल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. अर्थ विभाग सध्या स्वतःकडेच राहणार असून त्याबाबत कोणताही बदल प्रस्तावित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.CM Devendra Fadnavis
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या सत्तासमीकरणात मोठे बदल झाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र अजित पवार यांच्याकडे असलेले महत्त्वाचे अर्थखाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले होते. तेव्हापासून हे खाते पुढे सुनेत्रा पवारांकडे दिले जाईल का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.CM Devendra Fadnavis
या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले की, सध्या अर्थ विभागाचे कामकाज सुरळीत सुरू असून कोणताही बदल करण्याचा निर्णय झालेला नाही. राज्याच्या आर्थिक नियोजनासह आगामी प्रकल्प आणि विकासकामांच्या दृष्टीने हे खाते अत्यंत महत्त्वाचे असल्याने सातत्य राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्याकडे सध्या राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास ही खाती आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी महायुती सरकारमध्ये सक्रिय भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः शेतकरी आणि कांदा प्रश्नासारख्या विषयांवर त्यांनी अलीकडेच दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकींमध्ये सहभाग घेतला होता.
महायुती सरकारमध्ये खातेवाटप आणि भविष्यातील राजकीय समतोल यावरून चर्चा सुरू असतानाच फडणवीसांच्या या विधानामुळे अर्थखात्याबाबतचा संभ्रम काही काळासाठी तरी दूर झाल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता, महायुतीतील समन्वय आणि सत्तासंतुलनावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App