विशेष प्रतिनिधी
नाशिक : डोनाल्ड ट्रम्प नावाच्या रेड्याची कुर्बानी द्यायला बांगलादेश सरकार घाबरले; डोनाल्ड ट्रम्प ला मुकाट्याने प्राणी संग्रहालयात हलविले!!, ही घटना बांगलादेशात बकरी ईदच्या आदल्या दिवशी घडली.Bangladesh government was afraid to sacrifice a crocodile named Donald Trump; Donald Trump was silently moved to a zoo!!
बांगलादेशातील नारायण गंज मध्ये जनावरांच्या बाजारातून एका भुऱ्या रंगाच्या रेड्याची खरेदी एकाने केली होती. या रेड्याच्या डोक्यावरची केसांची रचना आणि अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या केसांची रचना सारखी असल्याने त्या रेड्याच्या मालकाने त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प ठेवले. पण नेमके हे नाव ठेवणेच त्याला अडचणीचे ठरले.
#WATCH | Dhaka, Bangladesh | A viral albino buffalo nicknamed 'Donald Trump' relocated to the national zoo for preservation after being rescued from being sacrificed as part of the Eid al-Adha festival's 'Qurbani' ritual. https://t.co/28VYBqzJrU pic.twitter.com/xIvNrUKLSr — ANI (@ANI) May 28, 2026
#WATCH | Dhaka, Bangladesh | A viral albino buffalo nicknamed 'Donald Trump' relocated to the national zoo for preservation after being rescued from being sacrificed as part of the Eid al-Adha festival's 'Qurbani' ritual. https://t.co/28VYBqzJrU pic.twitter.com/xIvNrUKLSr
— ANI (@ANI) May 28, 2026
– डोनाल्ड ट्रम्प रेडा व्हायरल
डोनाल्ड ट्रम्प या रेड्याला पाहण्यासाठी बांगलादेश मधल्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली डोनाल्ड ट्रम्प हा रेडा सोशल मीडियावर पण प्रचंड व्हायरल झाला. त्याबरोबर बांगलादेशातल्या अमेरिकन दूतावासाला जाग आली. डोनाल्ड ट्रम्प नावाच्या रेड्याची बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी दिली, तर अमेरिकन अध्यक्षांच्या नावाची सगळ्या जगभर बदनामी होईल. त्यातून नवे प्रश्न निर्माण होतील, याची भीती अमेरिकन दूतावासाला वाटली. अमेरिकन दूतावासाने बांगलादेशी सरकारला दम भरला. कोणत्याही परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प नावाच्या रेड्याची कुर्बानी होता कामा नये. अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा दम दिला.
– बांगलादेशाचे सरकार घाबरले
बांगलादेशच्या सरकारला सुद्धा त्या दमबाजी मधले गांभीर्य जाणवले. त्याबरोबर बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने वेळीच हस्तक्षेप करून डोनाल्ड ट्रम्प नावाच्या रेड्याची कुर्बानी द्यायची नाही, असा आदेश काढला. त्यापाठोपाठ बांगलादेशी पोलिसांनी नारायणगंज मध्ये जाऊन डोनाल्ड ट्रम्प रेड्याचा ताबा घेतला आणि त्याची रवानगी ढाक्याच्या प्राणी संग्रहालयात करून टाकली. तिथे त्याची राहण्या खाण्याची व्यवस्था केली. केवळ डोनाल्ड ट्रम्प या नावामुळे त्या रेड्याची कुर्बानी झाली नाही. बांगलादेश सरकारची तशी हिंमतच झाली नाही. कारण त्या सरकारने डोनाल्ड ट्रम्प रेड्याची कुर्बानी घडू दिली असती, तर बांगलादेशाला त्याची फार मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली असती. डोनाल्ड ट्रम्प नावाच्या अमेरिकन अध्यक्षांनी आणि त्यांच्या प्रशासनाने बांगलादेशला सहज सोडले नसते. अनेक ठिकाणी त्या देशाची पुरती मुस्कटदाबी केली असती. पण बांगलादेशाच्या सरकारने डोनाल्ड ट्रम्प नावाच्या रेड्याला वाचून स्वतःच्या देशावरची कारवाई टाळली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App