५७७४ एमएसएमई कंपन्यांचा सर्व्हे; ९१% कंपन्या सुरू, कोविडमुळे ९% कंपन्या बंद!!; राहुल गांधी म्हणतात, सरकार नापास!!

नाशिक : केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने ऑगस्ट 2020 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात 5774 एमएसएमई कंपन्यांचा सहभाग नोंदवण्यात आला होता. यामधल्या 91% कंपन्या कोविड काळात सुरू होत्या. परंतु यामुळे 9% कंपन्या बंद कराव्या लागल्या. ही केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.Survey of 5774 MSME companies; 91% of companies start, 9% of companies close due to Kovid !!; Rahul Gandhi says, the government has failed

या संदर्भातील लेखी प्रश्न काँग्रेसचे वरिष्ठ खासदार राहुल गांधी यांनी विचारला होता. या प्रश्नाला केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी लेखी उत्तर दिले आहे.या लेखी उत्तरांमध्ये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, की ऑगस्ट 2000 मध्ये जो सर्व्हे करण्यात आला,



त्यामध्ये 5774 कंपन्यांचा सहभाग होता. 91% कंपन्या सुरू होत्या. परंतु कोविडच्या प्रादुर्भावामुळे आणि अन्य काही कारणांमुळे 9% टक्के कंपन्या बंद कराव्या लागल्या.

खासदार राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर सरकारने दिलेले लेखी उत्तर शेअर केले असून सरकार नापास झाल्याचेही नमूद केले आहे. त्याचबरोबर मोदी सरकार फक्त स्वतःच्या उद्योगपती मित्रांसाठी काम करते. इतरांची अर्थ व्यवस्था ठप्प करते जनतेच्या रोजगारासाठी काम करत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

परंतु कोविड काळात 91% कंपन्या सुरू आणि 9% कंपन्या बंद असे प्रमाण असताना सरकार नापास झाले असे कसे म्हणता येईल?, 91 टक्के एम एस एम कंपन्या या बड्या उद्योगपतींच्या आहेत का एम एस एम ई मंत्रालय या बड्या उद्योगपतीने साठी काम करते आहे का असे खोचक सवाल आता सोशल मीडिया वरून करण्यात येत आहेत.

Survey of 5774 MSME companies; 91% of companies start, 9% of companies close due to Kovid !!; Rahul Gandhi says, the government has failed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात