प्रतिनिधी
ग्लास्गो – तापमानवाढीची समस्या गंभरि होत असल्याने सर्व देशांनी २०*२२ च्या अखेरीपर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अधिक मोठी उद्दिष्टे निश्चि्त करावीत, असे आवाहन जागतिक हवामान बदल परिषदेत करण्यात आले आहे. Glasgo summit declares memorandum
या परिषदेचा मसुदा आज जाहीर करण्यात आला. हा मसुदा केवळ सात पानांचा असला तरी यामध्ये ठोस कृती करण्यावर भर देण्यात आला आहे. अनेक देशांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उद्दिष्टे निश्चिरत केली आहेत.
अनेक विकसित देशांनी २०५० पर्यंत कार्बनमुक्ती साध्य करण्याची घोषणा केली आहे. या कालावधीत सुधारणा करून तो आणखी कमी करावा, असे आवाहन मसुद्यात करण्यात आले आहे. या मसुद्यावर चर्चा होऊन त्यावर सर्व देशांनी सह्या केल्यावर त्याचे करारात रुपांतर होणार आहे.
कराराच्या या मसुद्यात वेगळेपण नसले तरी तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या मुद्द्यावर भर दिल्याबाबत पर्यावरणवाद्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App