संजय राऊत यांच्या पत्नीने ईडीच्या नोटीसीला दोनदा दाखविला होता ठेंगा आणि कारण दिले होते आजाराचे…


विशेष प्रतिनिधी 
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. यामुळे  राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. संजय राऊत यांनी तर नोटीस मिळालीच नसल्याचा दावा केला आहे. पण, पत्नी वर्षा यांना पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी दोनदा नोटीस बजावली होती; पण आजाराचे कारण दाखवून उपस्थित राहण्याचे टाळले होते.
Sanjay Raut’s wife issues ED notice twice
ईडीची नोटीस ही ५५ लाखांच्या कर्जापोटी बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले ५५ लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले  होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. त्यामुळे या ५५ लाखांच्या माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.

Sanjay Raut’s wife issues ED notice twice

पीएमसी बँक घोटाळ्या  प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे.  संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं, “आ देखे जरा किसमे कितना है दम जमके रखना कदम मेरे साथीया..”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण