लखीमपूर खेरीची घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: लखीमपूर खेरीची घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. The Lakhimpur incident is the Jallianwala Bagh massacre, allegation of Sharad Pawar

नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ व्हावं असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे याची चौकशीची जबाबदारी देण्याची मागणी केली.

पवार म्हणाले, केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाही. जालियनवाला बागमध्ये झालेली परिस्थिती येथे निर्माण झालेली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, शांततेने आंदोलन सुरू आहे. मात्र, २६ जानेवारीला त्यांच्यावर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया पूर्णपणे देशभर उमटल्या.

The Lakhimpur incident is the Jallianwala Bagh massacre, allegation of Sharad Pawar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण