पंतप्रधानांना जुमला म्हणता, लोकांची माथी भडकवता हेच का तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्यायालयाने उमर खालीदला सुनावले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधानांबाबत बोलताना जुमला शब्द वापरता. लोकांची माथी भडकवता. हेच तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असा सवाल करत दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालीद याला विचारला आहे.Said Jumla to Prime Minister , why is your freedom of expression provoking the people, the court slamed Umar Khalid

ईशान्य दिल्ली दंगलीच्या मोठ्या कट रचल्याप्रकरणी विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालिदच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारवर टीका करताना लक्ष्मण रेषा असावी. खालीदचे अमरावीत येथील भाषण आक्षेपार्ह, घृणास्पद आणि द्वेषपूर्ण असल्याचे निरिक्षण नोंदवित न्यायालय म्हणाले,हे आक्षेपार्ह, अप्रिय आहे असे वाटत नाही का? आपल पूर्वज इंग्रजांची दलाली करत होते असे म्हटणे योग्य आहे का?  भाषणात तुम्ही असे बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. असे तुम्ही किमान पाच वेळा सांगितले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारा केवळ एक विशिष्ट समुदायच होता, असे म्हटल्यासारखे आहे. भाषणात पंतप्रधानांबद्दल काय बोलतात? चंगा  शब्द वापरला गेला आणि त्यानंतर जुमला शब्द भारताच्या पंतप्रधानांसाठी वापरला गेला. ते योग्य आहे का?

खालिदचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील त्रिदीप पैस यांनी असा युक्तिवाद केला की सरकारवर टीका करणे बेकायदेशीर नाही. सरकारवर टीका करणे हा गुन्हा होऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या  व्यक्तीला 583 दिवस तुरुंगात ठेवण्याइतके  असहिष्णु आपण होऊ शकत नाही. असे झाले तर लोक बोलूच शकणार नाहीत.

Said Jumla to Prime Minister , why is your freedom of expression provoking the people, the court slamed Umar Khalid

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”