२०१७ मध्येच भाजप-राष्ट्रवादीत युतीची झाली होती चर्चा; आशिष शेलारांचा “गौप्यस्फोट”!!  


प्रतिनिधी

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या ललिताची कीर्तन अध्यक्ष सुरू असून आता आशिष शेलार यांनी केला गौप्यस्फोटाची फोडणी दिली आहे.BJP-NCP alliance was discussed in 2017; Ashish Shelar’s “Goupyasphot”

सध्या शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप कसोशीने करत आहे. त्यामुळे भाजप यामध्ये व्हिलन ठरत आहे, अशा परिस्थितीत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला. भाजपला राष्ट्रवादीसोबत युती करायची होती, त्यासाठी २०१७ मध्येच चर्चा झाली होती, असे शेलार म्हणाले.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या सकाळी घेतलेल्या शपथविधीवरून भाजपावर टीका केली जात आहे. आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये २०१७ मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला आहे.

शिवसेनेचे मंत्री रोज खिशात राजीनामा घेऊन फिरायचे. सामनामधून सरकारवर जहरी टीका यायची. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. पण केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रवादी – शिवसेना या दोन्ही पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेसला अलग पाडण्याची रणनीती सांगितली होती. पण तेव्हा राष्ट्रवादी शिवसेनेचा बरोबर घ्यायला राजी नव्हती. आता मात्र तीच राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर गेली आहे, असे आशिष शेलार म्हणाले. या वर आता अनेकांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

BJP-NCP alliance was discussed in 2017; Ashish Shelar’s “Goupyasphot”

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”