विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्यातील मतदानाला आता केवळ काही तास उरले आहेत. जाटबहुल पश्चिम उत्तर प्रदेशात होत असलेल्या १०२ जागांबाबत प्रचंड उत्सुकता आहे. याच ठिकाणी उत्तर प्रदेशातील आगामी सत्ताधाऱ्या चा फैसला होणा आहे.In western Uttar Pradesh, BJP will win, it was clear in the C-Voter survey
या भागात भाजपला समाजवादी पक्ष- राष्ट्रीय लोकदल आघाडीकडून आव्हान दिले जात असले तरी बाजी भाजपच मारणार असल्याचे सी व्होटरच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.मतदानापूर्वी झालेल्या शेवटच्या ओपिनियन पोलच्या निकालावरून मुख्य लढत भाजप आणि सपा यांच्यात असल्याचे दिसून येते.
सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. भाजपला २२५-२३७ जागा मिळू शकतात. समाजवादी पक्षाला १३९-१५१ जागा मिळू शकतात. बसपाला १३-२१ जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेसला फक्त ४-८ आणि इतरांना २-६ जागा मिळू शकतात असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि सपा-आरएलडी युतीतून भाजपचे आव्हान वाढल्याने बहुतांशी नजर पश्चिम यूपीकडे आहे. सी व्होटर ओपिनियन पोलनुसार, पश्चिम उत्तर प्रदेशातील १३६ जागांपैकी भाजप ७१-७५ जागा जिंकू शकतो,
तर सपा ५०-५४ जागा जिंकू शकतो. बसपाला ८-१० जागा मिळू शकतील, तर काँग्रेसला १-३ जागांवर समाधान मानावं लागेल. याशिवाय इतरांना ०-१ जागा मिळू शकतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App