“भावी मुख्यमंत्री” बोर्ड पाहताच एकनाथ शिंदे भडकले… की… बिचकले??… पुढे काय केले??

प्रतिनिधी

ठाणे : महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकार मधील शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा 4 फेब्रुवारी रोजी वाढदिवस झाला. या पिता-पुत्रांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा देणारे अनेक बोर्ड लावले होते. eknath shinde saw cm board

यामध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख प्रेमाने “भावी मुख्यमंत्री” असा करण्यात आला होता. परंतु हा उल्लेख पाहताच एकनाथ शिंदे भडकले… की… बिचकले…?? त्यांनी ताबडतोब शिवसैनिकांना फोन लावला. भले तुम्ही माझ्यावरील प्रेमापोटी “भावी मुख्यमंत्री” असा उल्लेख केला असेल, पण तो ताबडतोब पुसा असा आदेशच त्यांनी काढला…!! त्यानंतर ताबडतोब शिवसैनिक ॲक्टिव्ह झाले आणि त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा असणाऱ्या बोर्डावरचा “भावी मुख्यमंत्री” हा उल्लेख रंगसफेदी करून पुसून टाकला.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा होणे हे नेमके कुणाला खटकले असेल?? का खटकले असेल?? कोणाच्या भविष्यकालीन राजकीय वाटचालीस त्यामुळे अडथळा येत असेल?? याविषयी शिवसेनेने बरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू झाली. याचे उत्तर राजकीय नेत्यांनी जरी थेट दिले नाही तरी शिवसैनिक आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र या उत्तराची अधिक चर्चा होताना दिसत आहे.

eknath shinde saw cm board

महत्त्वाच्या बातम्या