Corona Updates : देशात सलग तिसर्‍या दिवशी २.५९ लाखांहून अधिक रुग्ण, २४ तासांत १७६१ जणांचा मृत्यू

Corona Updates In India

Corona Updates in india : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर परिस्थिती ओढावली आहे. दररोज मृतांची संख्या वाढत असल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2.59 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी संसर्गामुळे 1,761 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. याआधी सोमवारी कोरोनाचे विक्रमी २.७४ लाख रुग्ण आढळले होते. Corona Updates in india More than 2.59 lakh patients, 1761 deaths in 24 hours


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर परिस्थिती ओढावली आहे. दररोज मृतांची संख्या वाढत असल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2.59 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी संसर्गामुळे 1,761 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. याआधी सोमवारी कोरोनाचे विक्रमी २.७४ लाख रुग्ण आढळले होते.

देशातील कोरोना रुग्णांच्या सातत्याने वाढणाऱ्या संख्येमुळे सर्वात जास्त प्रभावित राज्यांमध्ये बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. अनेक शहरांमध्ये स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारांसाठी प्रतीक्षा करावी लागतेय. हे चित्र मोठे विदारक आहे.

सर्वाधिक मृत्यू भारतात

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 रुग्ण आढळले असून देशातील एकूण रुग्णांची संख्या 1,53,21,089 वर गेली आहे. त्याच वेळी मागच्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 1,761 जण मरण पावले आहेत. कोरोनामुळे मृत्यूची संख्या 1,80,530 वर पोहोचली. एकाच दिवसात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून कोरोनामधील नवीन रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे.

सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत, कोरोनाचे 1,54,761 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील 1,31,08,582 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनाचा पराभव केला आहेत. दररोज नोंद होणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 20,31,977 वर पोहोचली आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक सक्रिय रुग्ण भारतात आहेत.

Corona Updates in india More than 2.59 lakh patients, 1761 deaths in 24 hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात