Corona Updates in india : कोरोना महामारीच्या संसर्गाने देशभरात थैमान घातलेले आहे. शुक्रवारी सलग तिसर्या दिवशी देशात कोरोनाचे 1.25 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारी, कोरोना विषाणूने साथीचा प्रादुर्भाव झाल्यापासून सर्व रेकॉर्ड तोडले असून एका दिवसात 1 लाख 44 हजारांहून अधिक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यापूर्वी गुरुवारी एक लाख 31 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी 83.29 टक्के रुग्ण महाराष्ट्र-छत्तीसगडसह दहा सर्वाधिक प्रभावित राज्यांशी संबंधित आहेत. Corona Updates in india, 1 lakh 45 thousand patients Found in a day
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संसर्गाने देशभरात थैमान घातलेले आहे. शुक्रवारी सलग तिसर्या दिवशी देशात कोरोनाचे 1.25 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारी, कोरोना विषाणूने साथीचा प्रादुर्भाव झाल्यापासून सर्व रेकॉर्ड तोडले असून एका दिवसात 1 लाख 44 हजारांहून अधिक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यापूर्वी गुरुवारी एक लाख 31 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी 83.29 टक्के रुग्ण महाराष्ट्र-छत्तीसगडसह दहा सर्वाधिक प्रभावित राज्यांशी संबंधित आहेत.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासांत भारतात कोरोना विषाणूची 1,44,829 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. याच काळात देशभरातील 773 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे, भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 13,202,783 वर पोहोचली आहे, जी संपूर्ण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी या विषाणूमुळे मृतांचा आकडा 168,467 ओलांडला आहे. हा अमेरिका, मेक्सिको आणि ब्राझीलनंतरचा उच्चांक आहे.
India reports 1,45,384 new COVID19 cases, 77,567 discharges, and 794 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry Total cases: 1,32,05,926Total recoveries: 1,19,90,859Active cases: 10,46,631Death toll: 1,68,436 Total vaccination: 9,80,75,160 pic.twitter.com/ed39ltrY7W — ANI (@ANI) April 10, 2021
India reports 1,45,384 new COVID19 cases, 77,567 discharges, and 794 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,32,05,926Total recoveries: 1,19,90,859Active cases: 10,46,631Death toll: 1,68,436
Total vaccination: 9,80,75,160 pic.twitter.com/ed39ltrY7W
— ANI (@ANI) April 10, 2021
यापूर्वी गुरुवारी कोरोनामुळे संक्रमित 1,31,968 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारच्या आकडेवारीपूर्वी देशात एकाच दिवसात नोंदवल्या गेलेली ही सर्वाधिक नोंद होती. भारतातील रिकव्हरीचा दर 91.22 टक्क्यांवर आला आहे आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढून 7.50 टक्क्यांवर गेले आहे. त्याच वेळी मृत्युदर घटून 1.28 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
भारतातील दहा राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 83.29 रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळून आले आहेत. त्यापैकी 53.84 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. येथे 56,286 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक नवीन रुग्णांच्या बाबतीत दुसर्या, तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
Corona Updates in india, 1 lakh 45 thousand patients Found in a day
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App