अमित शहा, उद्धव ठाकरे आदींकडून महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिष्टचिंतन


विेशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील बाबासाहेबांचे अभिष्टचिंतन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेबांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख “महाराष्ट्र भूषण” असा आवर्जून केला आहे. Congratulations to Maharashtra Bhushan Shivshahir Babasaheb Purandare from Amit Shah, Uddhav Thackeray and others

बाबासाहेबांना शुभेच्छा देणारे ट्विट अमित शहा यांनी केले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ओजस्वी वाणी आणि लेखणीतून साकार झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्तचरित्र संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या जाणता राजा या नाटकामुळे प्रेरणादायी शिवचरित्र घराघरात पोहोचले. बाबासाहेबांना दीर्घायुष्य लाभो अशी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो असे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



मंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी यांना वाढदिवसाच्या आदरपूर्वक शुभेच्छा! शिवतेज मनामनात पोहचवण्याचा ध्यास घेतलेल्या बाबासाहेबांकडून ही सेवा निरंतर घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Congratulations to Maharashtra Bhushan Shivshahir Babasaheb Purandare from Amit Shah, Uddhav Thackeray and others

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात