बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार


विशेष प्रतिनिधी

गुजराणवाला : बड्या घरच्या श्वानाची गोष्ट वेगळी असते. मालकाला खुश करण्यासाठी या श्वानाचे कौडकौतुक करताना अनेक जण थकत नाहीत. पण हे श्वान गायब झाले तर…आकाश-पाताळ एक करून शोध सुरू होतो. असाच प्रकार पाकिस्तानातील गुजराणवाला येथे घडला.The police and the municipal corporation worked to find dog

गुजराणवालाचे आयुक्त झुल्फिकार घुमान यांचा पाळीव कुत्रा मंगळवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थानावरून बेपत्ता झाला. याचे कारण म्हणजे प्रवेशद्वार काही काळ उघडे राहिले आणि या श्वानाने स्वातंत्र्याचा क्षण अनुभवला.



मात्र, हा कुत्रा गायब झाल्यावर सगळी यंत्रणाच त्याच्या शोधासाठी बाहेर पडली.आयुक्तांनी आदेश काढले आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीसही सक्रीय झाले. पोलीसांनी आयुक्तांच्या घराभोवती कडे केले.

कुत्र्याला शोधण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली. अगदी लाऊडस्पिकरवरून घोषणा देत कुत्र्याचा शोध सुरू झाला. ऐवढेच नव्हे तर हा कुत्रा कोणाकडे आढळल्यास कडक कारवाइॅ करण्याचा इशाराही देण्यात आला.

The police and the municipal corporation worked to find dog

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात