टाटा मोटर्स पुढील आठवड्यात वाढविणार मोटारींच्या किंमती, टियोगो, नेक्सॉन, हैरियार आणि सफारी होणार महाग


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून नव्या किंमती लागू होणार आहेत. टियागो, नेक्सॉन, हैरियर और सफारी यासारखी प्रवासी वाहने महागणार आहेत.Tata Motors to raise car prices next week, Tiogo, Nexon, Harrier and Safari to become more expensive

टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन विभागाचे प्रेसिडेंट शैलेश चंद्र यांनी सांगितले की, कंपनी आत्तापर्यंत उत्पादन किंमतीमध्ये अगदी थोडासा नफा घेऊन मोटारी विकत होती. मात्र, गेल्या वर्षभरात पोलाद आणि इतर धातूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.यामुळे गेल्या वर्षभरात आमच्या महसुलात ८ ते ८.५ टक्केंनी कमी झाला आहे. त्यामुळे टाटा मोटर्स आपल्या प्रवासी वाहनांच्या पूर्ण साखळीमध्ये वाढ करू इच्छित आहे. त्यामुळे पोलाद आणि इतर धातूंच्या किंमतीत होत असलेल्या वाढीमुळे होणारा तोटा कमी होणार आहे.

टाटा मोटर्स टियागो एनआरजीच्या फेसलिफ्ट व्हर्जनचे ४ ऑगस्ट २०२१ रोजी लॉँचींग करणार आहे. ही मोटार टफ आणि स्पोर्टी असेल. या मोटारीचे नाव अद्याप ठरले नाही. त्याचबरोबर डिझाईनही अद्याप जाहीर केलेले नाही.

Tata Motors to raise car prices next week, Tiogo, Nexon, Harrier and Safari to become more expensive

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण