पिंपरी-चिंचवड महापालिकेची टाटा मोटर्सला २५९ कोटी रुपये करवसुलीची नोटीस, वाढीव बांधकामांची सॅटेलाईटद्वारे पाहणी


विशेष प्रतिनिधी

पुणे : महापालिकेच्या वतीने नोंदणी न केलेल्या मिळकतींचा शोध घेण्याची मोहीम सुरू असूून टाटा मोटर्सने केलेल्या वाढीव बांधकामांना नोटीस दिली आहे. सुमारे २५९ कोटी करवसूलीची नोटीस दिली आहे, अशी माहिती पिंपरी=चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिली.Pimpri-Chinchwad Municipal Corporation issues Rs 259 crore tax recovery notice to Tata Motors, inspects incremental constructions via satellite

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नोंदणी न केलेल्या मिळकतींचा शोध घेतला जात आहे. सॅटलाईट इमेजच्या आधारे हा शोध सुरू असून प्रत्यक्षात उभारलेली इमारत, त्यांची महापालिकेकडे असणारी नोंद याबाबत तपासणी केली जात आहे. सर्वेक्षणाचे काम खासगी संस्थेला दिले असून त्यातून मिळकतींचा शोध घेतला जातो.



त्यानंतर पथक स्थळपाहणी करून त्यासंदभार्तील माहिती करसंकलन विभागास देते. त्यानंतर मोजमाप घेऊन करसंकलन विभागाच्या वतीने नोटीस दिली जाते. त्यानंतर कर आकरणी केली जाते.पिंपरी-चिंचवड परिसरातील खासगी कंपन्यांनी महापालिकेने केलेल्या कर आकारणी संदर्भात दावे, न्यायालयात दाखल आहेत.

त्यामुळे खासगी कंपन्यांकडून येणाºया करवसूलीवर परिणाम झाला आहे. टाटा मोटर्सने कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले आहे. मात्र, त्यांची नोंद कर संकलन विभागात केलेली नाही. याबाबत सर्वेक्षण टीमने सॅटलाईट इमेजच्या आधारे पाहणी केली.

तसेच बांधकाम परवान विभागातील आराखडे तपासले. त्यातून काही मिळकतीची नोंद महापालिकेत केली नसल्याचे आढळून आले.टाटा मोटर्सला महापालिकेने २५९ कर भरण्याची नोटीस दिली आहे. दोन टप्प्याची कराबाबतची नोटीस दिली आहे. त्यात १९४ कोटी आणि दुसऱ्या प्रकरणात ६५ कोटींची मागणी केली आहे.

दहा दिवसांपूर्वी नोटीस दिली असून मत मांडण्यासाठी एकवीस दिवसांची मुदत दिली आहे. २०१६ आणि २०१९ अशा दोनदा कर भरण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. वाढीव कर आकारणीबाबत महापालिकेला कंपनी दाद देत नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच कंपनीच्या आवारातही अधिकाºयांना येऊन दिले जात नाही.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation issues Rs 259 crore tax recovery notice to Tata Motors, inspects incremental constructions via satellite

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात