घराणेशाही वाचविण्यासाठीच कॉँग्रेस, शिवसेनेसेह विरोधी पक्ष एकत्र, संबित पात्रा यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: काँग्रेस आणि शिवसेनेसह इतर प्रादेशिक पक्ष एकत्र आले होते. पण एकत्र येण्यामागचा त्यांचा हेतू हा आपली ‘घराणेशाही वाचवण्याचा’ होता, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी विरोधकांना लगावला आहे. पंतप्रधान मोदी हे देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.Allegations of Congress, Shiv Sena and Opposition united to save the dynasty

पेगासस हेरगिरी प्रकरणावरून केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपची संसदेत कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. केंद्र सरकारविरोधात १४ विरोधी पक्षांची बैठक झाली. यावर बोलताना पात्रा म्हणाले, देशावर आणि संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या करोनाच्या संसर्गावर चर्चा करण्यास विरोधक तयार नाहीत.



यामुळे हाच खरा देशद्रोह आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेचं कामकाज रोखून धरलं आहे. यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ दडला आहे. सध्या करोनाची तिसरी लाट कशी रोखता येईल? आणि लसीकरण हे मोठे मुद्दे आहेत. पण विरोधक संसदेत यावर चर्चा होऊ देत नाहीत. यामुळे हाच खरा देशद्रोह आहे.

पेगासस हेरगिरीचा मुद्दा हा विरोधी पक्षांनी तयार केलेला आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या मुद्द्याचं हत्यार बनवू पाहत आहेत. जो मुद्दाच नाही अशा गोष्टीवरून ते संसदेचं कामकाज रोखत आहेत. हे विरोधी पक्ष संसदेत जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.

करोना संसर्गावर चचेर्साठी हेच विरोधी पक्ष संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करत होते. आता संसदेच नियमित अधिवेशन सुरू असताना करोनावर चर्चा करण्याऐवजी ते कामकाज होऊ देत नाहीत, असं संबित पात्रा म्हणाले.

पात्रा म्हणाले, विरोधी पक्ष यापूवीर्ही एकत्र आले होते. २०१८ मध्ये कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस (धर्मनिरपेक्ष जनता दल ) यांचे आघाडी सरकार स्थापन झाले होते. यावेळी भाजपविरोधी नेते एकजूट झाले होते. एवढचं नव्हे तर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने २०१७ ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवली होती.

काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष यांचा हेतू हा देशाचा विकास नव्हे तर आपली घराणेशाही वाचवण्याचा आह . नरेंद्र मोदी हे कुठल्या राजकीय घराण्यातून आलेले नाहीत. यामुळे ते देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत.

Allegations of Congress, Shiv Sena and Opposition united to save the dynasty

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात